Join us  

​गाणे पुन्हा नव्याने...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2017 9:01 PM

old songs in new bollywood films ; शाहरुख खानचा ‘रईस’ व हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटातील आयटम नंबरची सोशल मीडिया व युट्यूबवरही यांच्यात स्पर्धा लागली आहे. अशाच काही जुन्या पण नवीन रुपात आलेल्या गाण्यांची ही माहिती...​

बॉलिवूडमध्ये जुनी फॅशन पुन्हा नव्या रूपात येते असे आपण पाहत आलो आहोत. नव्या चित्रपटांना जुन्या चित्रपटांची नावे. जुन्या चित्रपटांची नवे स्वरूपात निर्मिती आता हा ट्रेंड चांगलाच रुढ झाला आहे.  जुन्या गाण्याचा वापर चित्रपटात वापरण्याचा पायंडा काही नवा नाही. मात्र, आयटम नंबरसाठी जुन्या आयटम किंवा सिझलिंग नंबरचा वापर हा ट्रेन्ड सध्या बॉलिवूडमध्ये आला आहे. विशेष म्हणजे नव्या रूपात आलेल्या या गाण्यांना चाहत्यांनी तेवढेच डोक्यावर घेतले आहे. शाहरुख खानचा ‘रईस’ व हृतिक रोशनच्या ‘काबिल’ या चित्रपटातील आयटम नंबरची सोशल मीडिया व युट्यूबवरही यांच्यात स्पर्धा लागली आहे. अशाच काही जुन्या पण नवीन रुपात आलेल्या गाण्यांची ही माहिती...लैला मै लैला : अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक फिरोज खान यांच्या ‘कुर्बानी’ या चित्रपटातील अभिनेत्री झीनत आमन हिच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘लैला मै लैला’ हे गाणे शाहरुख खानने आपल्या रईस या चित्रपटात सनी लिओनवर चित्रीत केले आहे. जुन्या व नव्या गाण्यांत बरेच साम्य पहायला मिळते. दोन्ही गाणी डान्स नंबर असून, यात अभिनेत्रींचा हॉट लूक दाखविण्यात आला आहे. या सोबतच जुन्या गाण्याची कॉपी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे. सारा जमाना : अमिताभ बच्चन व अमजद खान यांच्या भूमिका असलेल्या याराना या चित्रपटातील सारा जमाना हे गाणे. राकेश रोशन निर्मित व संजय गुप्ता दिग्दर्शित हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेल्या काबिल या चित्रपटात उर्वशी रौतेला हिच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्यातही जुण्या गाण्याची आठवण यावी असाच स्टेज तयार करण्यात आला आहे. अमिताभ यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या मूळ गाण्यात बाईकचा वापर करण्यात आला होता. या गाण्यातही उर्वशी देखील बाईकवर परफॉर्म करताना दिसते आहे. हम्मा हम्मा : दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘बॉम्बे’ या चित्रपटातील ‘हम्मा हम्मा’ हे गाणे दिग्दर्शक शाद अली याने आपल्या ‘ओके जानू’ या चित्रपटात वापरले आहे. ‘बॉम्बे’ या चित्रपटात ‘हम्मा हम्मा’ हे गाणे रॅप सिंगर रेमो याने गायले होते. पडद्यावर मनीषा कोईराला व अरविंद स्वामी दिसत होते. ‘ओके जानू’ मधील हम्मा हम्मा या गाण्यात बॉम्बेमधील डान्स सिक्वेंस कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दोन व्यक्ती एकत्र राहण्यास आल्यावर अंतरंगांची जादू कशी खुलत जाते हे या गाण्यातून लक्षात येते. गाण्याचा गाभा कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ओके  जानू मधील गाणे रॅप सिंगर बादशाहने गायले आहे. आज फिर तुमपे : ‘हेट स्टोरी’ या टी सिरीजच्या फ्रेंचायजीमध्ये जुन्या गाण्यांचे नवे व्हर्जन वापरण्यात आले आहेत. विशाल पांडया याने दिग्दर्शित केलेल्या हेट स्टोरी २ व ३ मध्ये जुन्या गाण्याचा उत्कृष्ट वापर करण्यात आला आहे.  ‘हेट स्टोरी २’ मध्ये फिरोज खान यांच्या ‘दयावान’ या चित्रपटातील ‘आज फिर तुम पे’ हे गाणे वापरण्यात आले होते. ‘हेट स्टोरी ३‘ या चित्रपटात ‘तुम्हे अपना बनाने की’ हे संजय दत्त व माधुरी दीक्षित यांच्या सडक या चित्रपटातील गाणे वापरण्यात आले होते. हे दोन्ही गाणे नव्या रुपात प्रेक्षकांना चांगलेच भावले. हर किसी को नही मिलता : अक्षय कुमारच्या ‘बॉस’ या चित्रपटात वापरण्यात आलेले ‘हर किसी को नही मिलता’ हे गाणे फिरोज खान यांच्या ‘जाँबाज’ या चित्रपटातील आहे. फिरोज खान व श्रीदेवी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले ‘जाँंबाज’ मधील हे गाणे सर्वांना आवडले होते. बॉसमध्ये अरिजीत सिंग याने या गाण्याला अतिशय चांगल्या पद्धतीने गायले आहे. या सोबतच नव्याने आलेल्या अनेक चित्रपटात जुन्या गाण्याची झलक पहायला मिळाली आहे. हंगामा हो गया  - क्वीन ‘कहते है मुझको हवा हवाई - शैतानअपनी तो जैसे तैसे - हाऊसफुल्ल रात अकेली है - रागिनी एमएमएसये मेरा दिल प्यार का दिवाना - डॉन बचना ऐ हसिनो - बचना ऐ हसिनो (टायटल साँग)तयब्ब अली प्यार का दुश्मन - वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दुबारादम मारो दम - दम मारो दम (टायटल साँग)