Join us  

'या' ड्रेसमुळे सोनम कपूरची सोशल मीडियावर उडवली जाते खिल्ली, तर यूजर्सनी म्हटले,‘हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 6:00 AM

आपल्या अनोख्या आणि हटक्या स्टाइलने सा-यांचं मनं जिंकली आहेत. एकीकडे स्टायलिश अंदाजामुळे रसिकांना घायाळ करणारी सोनमला हीच स्टाइल तिची खिल्ली उडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

आपला अभिनय, सौंदर्य, अदा याच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत सोनमने आपले वेगळं स्थान निर्माण केले आहे. बॉलीवूडची फॅशनिस्टा म्हणूनही सोनम कपूरला ओळखले जाते. सोनमच्या या स्टाइल सेन्समुळेच  तिला विविध या पुरस्कार सोहळ्यात स्टायलिश अभिनेत्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. आपल्या अनोख्या आणि हटक्या स्टाइलने सा-यांचं मनं जिंकली आहेत. एकीकडे स्टायलिश अंदाजामुळे रसिकांना घायाळ करणारी सोनमला हीच स्टाइल तिची खिल्ली उडवण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. अनेक वेळा सेलिब्रेटींना त्यांच्या  फॅशन एक्सपेरिमेंटविषयी ट्रोल केले जाते.

असाच काहीसा प्रकार सोनमबरोबर घडल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच एका पुरस्कार सोहळ्यात डिझायनर ड्रेस परिधान करत रेड कार्पेटवर सोनम अवतरली होती. मात्र तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना फारसा आवडला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या ड्रेसिंग स्टाइलची बरीच खिल्ली उडवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. एका युजरने म्हटले आहे की, "स्वतःला बॉलिवूडची मोस्ट स्टायलिस्ट अभिनेत्री कशी असू शकते. तर एकाने म्हटले आहे की, 'हिला तर ड्रेसिंग सेन्सच नाही’ . एकूणच  सोनमच्या फॅन्सना तिचा हा स्टायलिश अंदाज फारसा काही  रुचलेला नाही. त्यामुळेच तिला ट्रोल करत  चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच लवकरच सोनम पहिल्यांदा साऊथ सुपरस्टार दुलकर सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. चित्रपटाची कथा अनुजा चौहान लिखित ‘जोया फॅक्टर’ या कादंबरीवर बेतलेली आहे. सोनम यात एका अ‍ॅड एक्झिक्युटीव्हची भूमिका साकारताना दिसणार आहे. जी पुढे भारतीय क्रिकेट टीमसाठी लकी चार्म ठरते. दुलकर सलमान यात क्रिकेट टीमच्या कर्णधाराची भूमिका साकारतोय. साऊथ इंडस्ट्रीचा आघाडीचा स्टार दुलकर सलमानने अलीकडे ‘कारवां’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यामुळे ‘जोया फॅक्टर’ हा त्याचा दुसरा बॉलिवूडपट असणार आहे.

टॅग्स :सोनम कपूर