सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाच्या तारखेत झाला बदल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:02 IST
सोनम कपूर आणि आनंद अहुजाचे लग्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रोज नव्या नव्या गोष्टींचा खुलासा त्यांच्या लग्नाला घेऊन ...
सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाच्या तारखेत झाला बदल?
सोनम कपूर आणि आनंद अहुजाचे लग्न गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. रोज नव्या नव्या गोष्टींचा खुलासा त्यांच्या लग्नाला घेऊन होत असतो. संपूर्ण कपूर कुटुंबीय लग्नाची तयारी मोठ्या उत्साहात करतायेत. मीडिया रिपोर्टनुसार कपूर कुटुंबीय सोनमच्या लग्नाची तयारीला अनेक दिवसांपासून लागले आहेत. ज्यात लग्नच्या वेन्युपासून, लग्नात कोण-कोणाला आमंत्रण द्यायचे तसेच संगीत सेरेमनीमध्ये कोण कोणत्या गाण्यावर डान्स करणार या सगळ्या गोष्टींची तयारी करत आहेत. याआधी 7 आणि 8 मे रोजी दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा होती मात्र आता एक एंटरटेनमेंट पोर्टलच्या माहितीनुसार दोघांच्या कुटुंबीयांनी 7 आणि 8 मे रोजी लग्नाच्या पारंपरिक विधी पूर्ण करणार आहेत. लग्नात मोठे तीन फंक्शन ठेवण्यात आले आहेत. जे तीन वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार संगीत सेरेमनी सोनम कपूरच्या मैत्रिणीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. फराह खान कपूर कुटुंबीयांच्या डान्सची कोरियोग्राफी करते आहे. ज्यात अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांचे परफॉर्मेंस खास असणार आहे. ज्यासाठी दोघे विशेष मेहनत करतायेत. संगीत सेरेमनीनंतर मेंहदीचे फंक्शन होणार आहे जे सोनम कपूरच्या वांद्रे इथल्या लग्झरी डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये होणार आहे. सोनम कपूरचा हे अपार्टमेंट जवळपास 7 हजार स्केअरफिटचे आहे ज्याची किंमत 35 कोटींच्या आसपास आहे. ALSO READ : सोनम कपूर-आनंद अहुजाच्या संगीत सेरेमनीमध्ये या गाण्यावर परफॉर्मे करणार करण जोहर!जर सोनम कपूर आणि आनंद अहुजाच्या लग्नाबाबत बोलायचे झाले तर ते वांद्रे इथल्या हवेलीमध्ये संपन्न होऊ शकतो. ही हवेली 55 हजार स्केअरफिटचे आहे. याआधी सोनमचे लग्न स्वित्झर्लंडमध्ये होणार होते. मात्र दोघांच्या कुटुंबीयांमधील वृद्ध व्यक्तिना तिकडे घेऊन जाण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत होत्या म्हणून लग्न मुंबईत करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कळतेय. जूनमध्ये सोनमचा 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.