Join us

​कथीत बॉयफ्रेंडसोबत सोनाक्षीने घालवली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 14:43 IST

 त्यामुळे  त्यांचे डेटिंग पुन्हा सुरु झाल्याची चर्चा रंगली होती. परंतु, ती पार्टी बंटीच्या आईच्या वाढदिवसानिमित्त  होती.  त्यामध्ये एका ग्रुप ...

 त्यामुळे  त्यांचे डेटिंग पुन्हा सुरु झाल्याची चर्चा रंगली होती. परंतु, ती पार्टी बंटीच्या आईच्या वाढदिवसानिमित्त  होती.  त्यामध्ये एका ग्रुप सेल्फी मध्ये सोनाक्षी व बंटीसह काहीजणांचा  त्यामध्ये समावेश होता. फोटोमध्ये सोनाक्षी व बंटी या दोघांचा लूक हा वेगळा वाटत होता.  बंटी हा सोहेल खानची पत्नी सीमा खानचा भाऊ आहे. ही पार्टी रात्रभर सुरु होती, त्यामुळे सोनाक्षीही या पार्टीत सहभागी झाली होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार सोनाक्षी व बंटी हे दोघेही आपल्या भूतकाळात परतत आहेत. या दोघांची डेटिंग २०१२ मध्ये सुरु झाली होती. परंतु, त्यांची ही डेटींग जास्त दिवस चालली नाही. कारण की, सोनाक्षीच्या आईवडिलांना हे नाते मान्य नाही. त्यांच्या दोघांच्या वयामध्ये सुद्धा खूप फरक आहे. त्याचबरोबर बंटी हा घटस्फोटीत आहे. बंटीसोबतच्या ब्रेकअपनंतर सोनाक्षीचे अर्जून कपूरसोबत लिंकअपचे वृत्तही आले होते. तसेच सोनाक्षीसोबत ब्रेकअपनंतर बंटी सचदेवचे नाव हे सुष्मिता सेन, नेहा धूपिया व दिया मिर्जासोबत घेतले जात होते. सोनाक्षी आगामी अकिरा चित्रपटामुळे  सध्या चर्चेत आहे.