Join us  

सोनाक्षी सिन्हाच्या हातून निसटला एक सुपरहिट चित्रपट! ‘राऊडी राठोड2’मधून पत्ता कट!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 5:10 AM

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हातून एक सुपरहिट चित्रपट निसटलाय. होय, ताजी बातमी तरी तीच आहे. अक्षय कुमार व ...

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या हातून एक सुपरहिट चित्रपट निसटलाय. होय, ताजी बातमी तरी तीच आहे. अक्षय कुमार व सोनाक्षी सिन्हाचा २०१२ साली आलेला ‘राऊडी राठोड’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. लवकरच या सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल येतोय. अलीकडे अक्षयने या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली. आता या सीक्वलबाबत एक नवा खुलासाही झाला आहे. तो म्हणजे, यात अक्षयची हिरोईन म्हणून सोनाक्षी नसणार आहे. म्हणजेच सोनाचा पत्ता कट झालाय. ताजी खबर मानाल तर सोनाला कास्ट करण्याऐवजी या सीक्वलमध्ये एखाद्या नव्या हिरोईनला संधी द्यावी, असे मेकर्सचे मत पडले आहे. ‘राऊडी राठोड2’ हा चित्रपट ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी प्रोड्यूस करताहेत. अर्थात सोनाक्षीला चित्रपटात न घेण्याबाबत अद्याप भन्साळींनी काहीही उघडपणे सांगितलेले नाही.तूर्तास ‘राऊडी राठोड2’च्या तयारी जोरात आहेत. लवकरच याची फायनल स्टारकास्ट जाहीर होईल. ‘बाहुबली’चे लेखक के व्ही विजेन्द्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.तुम्हाला माहित असेलचं की, ‘राऊडी राठोड’ हा एका तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. पण ‘राऊडी राठोड2’ची कथा एकदम ओरिजनल असणार आहे. ‘राऊडी राठोड’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. प्रेक्षकांनी या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता याचा सीक्वल येणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेषत: अक्षयचे चाहते जाम खूश आहे़ दुसरीकडे सोनाचे चाहते थोडे हिरमुसले आहेत. पण शेवटी बॉलिवूडमध्ये ‘एक्का’ चालतो, हे विसरून कसे चालेल.ALSO READ : ‘आपला माणूस’च्या रिमेकमध्ये दिसणार बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री? जाणून घ्या कोण? सोनाक्षीचे फिल्मी करिअर गेल्या काही काळापासून फारसे सुस्थितीत नाही. तिचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत असल्याने तिला एका सुपरहिटची अत्यंत आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला तिचा ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ हा चित्रपटदेखील बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला.