सेंसार बोर्डानुसार, हे तिन्ही शब्द चित्रपटात नसायला हवेत. डीएनएच्या एका रिपोर्टनुसार, सेंसार बोर्डाने दलित शब्दावर आक्षेप घेतला आहे. कारण हा शब्द भारतीय जाती प्रथेवर इशारा करणारा आहे. या व्यतिरिक्त सेंसारने चित्रपटातील एका दारूच्या कंपनीचे नावही काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सेक्स टॉय शब्द बदलून अडल्ट साइट करण्याचेही सांगितले आहे. तर बरखा दत्त यांच्या नावावर आक्षेप घेताना बोर्डच्या एका मेंबरने स्पष्ट केले की, कोणत्याही जीवित व्यक्तीचे त्याच्या परवानगीशिवाय नाव वापरणे हे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही चित्रपट निर्मात्यांना हे पर्याय दिले की, तुम्ही प्रसिद्ध पत्रकार बरखा दत्त यांची परवानगी घ्या अन्यथा चित्रपटातून हे नाव काढून टाका. यावर बरखा दत्त हिने सेंसार बोर्डाला ट्विटदेखील केले आहे.}}}} ">Barkha without the Dutt dear Censor Board is kinda like poori minus channa. More seriously, how bizarre is this decision !! https://t.co/qPYSNLOqEy— barkha dutt (@BDUTT) April 14, 2017
सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’वर सेंसार बोर्डाची कात्री; ‘हे’ शब्द काढून टाकण्याचे दिले आदेश!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2017 21:45 IST
हल्ली सेंसार बोर्ड चित्रपटांबाबत खूपच कडक धोरण राबवित असल्याने कोणत्या चित्रपटावर सेंसार बोर्ड कात्री चालवणार हे सांगणे मुश्किलच म्हणावे ...
सोनाक्षी सिन्हाच्या ‘नूर’वर सेंसार बोर्डाची कात्री; ‘हे’ शब्द काढून टाकण्याचे दिले आदेश!!
हल्ली सेंसार बोर्ड चित्रपटांबाबत खूपच कडक धोरण राबवित असल्याने कोणत्या चित्रपटावर सेंसार बोर्ड कात्री चालवणार हे सांगणे मुश्किलच म्हणावे लागेल. कारण चित्रपट बघणाºया बोर्ड मेंबर्सच्या डोक्यात काय खलबत्ते सुरू आहेत, याचा एकाही चित्रपट निर्मात्यांना अंदाज बांधता येत नाही. कारण कुठल्या चित्रपटाबाबत सेंसार काय निर्णय घेईल याची सध्या प्रत्येक चित्रपट निर्मात्यात धडकी भरली आहे. नुकत्याच ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटावर बॅन लावल्याने सेंसार बोर्ड वादाच्या भोवºयात सापडले होते. या चित्रपटाचे निर्माते प्रकाश झा यांनी तर आता धार्मिक चित्रपटांची निर्मिती करणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता असाच काहीसा सामना सोनाक्षी सिन्हा हिच्या आगामी ‘नूर’ या चित्रपटाला करावा लागत आहे. कारण या चित्रपटावरही सेंसार बोर्डाने कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोनाक्षीच्या फॅन्सनी अजिबात काळजी करू नये. कारण सेंसारने या चित्रपटाच्या रिलीजवर बंदी घातली नसून, चित्रपटातील तीन सीन्सवर कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. सेंसारच्या मते चित्रपटात तीन शब्द आहेत जे आक्षेपार्ह आहेत. ‘दलित, सेक्स आणि बरखा दत्त’ या तीन शब्दांवर सेंसारने आक्षेप घेत ते चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.