हुमासोबतच्या रिलेशनबद्दल सोहलने सोडली चुप्पी...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2016 16:48 IST
सध्या खान कुटुंबात सलमान व यूलिया वेंटर यांच्याशिवाय आणखी एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे सोहेल खान याचे. सोहलचा ...
हुमासोबतच्या रिलेशनबद्दल सोहलने सोडली चुप्पी...!
सध्या खान कुटुंबात सलमान व यूलिया वेंटर यांच्याशिवाय आणखी एक नाव चर्चेत आहे. ते म्हणजे सोहेल खान याचे. सोहलचा ‘फ्रीकी अली’ हा चित्रपट कालच रिलीज झाला. पण यामुळे नाही तर सोहेल चर्चेत आहे, तो हुमा कुरेशीमुळे. सोहेल व हुमाच्या अफेअरची सध्या जोरात चर्चा सुरु आहे. आत्तापर्यंत सोहेल या मुद्यावर काहीही बोलला नव्हता. पण अखेर सोहेलने चुप्पी तोडलीच. एका मुलाखतीत बोलताना, हुमासोबतचे रिलेशन त्याने स्पष्टपणे नाकारले. माझ्या अफेअरच्या बातम्या कुठून येत आहे आहेत, मला ठाऊक नाही. पण निश्चितपणे अशा बातम्या मला हर्ट करतात. माझ्याबद्दल ज्या काही बातम्या छापून येत आहेत, त्यात काहीही तथ्य नाही. कुणाजवळ पुरावा असेल तर त्यांनी तो मला आणून द्यावा. त्यानंतर मी एक अवाक्षरही बोलणार नाही. पण पुरावा न देता माझ्याबद्दल, माझ्या खासगी आयुष्याबद्दल काहीही छापू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण याचा त्रास माझ्यापेक्षा माझ्या मुलांना अधिक होतो. मुलांवर याचा किती वाईट परिणाम होतो, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल, असे सोहेल म्हणाला. शेवटी सोहेलच्या म्हणण्यात दम तर आहे. पण बोलणाºयांची तोंडे कोण थांबवणार??