Join us  

म्हणून विद्या बालनने तुम्हारी सल्लु सिनेमासाठी दिली साडीलाच पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 11:44 AM

स्टाईल आहे.तिच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये साडीला विशेष महत्त्व आहे. कॉटन साडी, सिल्क, कांजीवरम, पैठणी, बनारसी अशा विविध प्रकारच्या विविध प्रांतातल्या ...

स्टाईल आहे.तिच्या फॅशन स्टेटमेंटमध्ये साडीला विशेष महत्त्व आहे. कॉटन साडी, सिल्क, कांजीवरम, पैठणी, बनारसी अशा विविध प्रकारच्या विविध प्रांतातल्या साड्या परिधान करायला विद्याला आवडतात. विद्याचे हेच साडीप्रेम याधीही ब-याचदा सा-यांनी पाहिलंय आणि आता ते  'तुम्हारी सुलु' सिनेमातीही पाहायला मिळणार आहे.या सिनेमात ती एका मध्यवर्गीय कुटुंबातील स्त्रीच्या भूमिकेत आहे, त्यामध्ये ती साडीमध्येच दिसणार आहे. मात्र या साड्या काही सर्वसाधारण साड्या नाहीत, तर खूप खास आहेत. तुम्हारी सुलु साठी विद्याने जेवढ्या साड्या नेसल्या आहेत त्या सर्व रिक रॉयने डिझाइन केल्या आहेत.तुम्हारी सुलुमधील साड्यांबद्दल रिक रॉय म्हणतो, आम्ही टेबल क्लॉथ, ड्रेस मटेरियल, दुपट्टा आणि सलवार कमीज मुंबईतील लोकल मार्केटमधून खरेदी केले, मात्र त्यानंतर आम्ही त्याला मिक्स मॅच करत साडी डिझाइन केली आहे. साडीच्या बॉर्डरवर सर्वाधिक आणि खास काम करण्यात आले.चित्रपटात विद्याने एका मध्यमवर्गीय महिलेची भूमिका साकारली आहे जी आरजे बनते. हाऊसवाइफ असल्याने विद्याला घरातील सर्व कामे करायीच असतात.त्यामुळे एक सामान्य महिला जी घरातली कामांसह बाहेर नोकरीही करते अशी तिच्या भूमिका आहे.  रिक विद्या साकारत असणारी भूमिकेला लागणारी प्रत्येक छोट्यातली छोटी गोष्टीवर रिकने बारकाईने काम केल्याचे दिसते. त्यामुळे विद्याही खूप खुश आहे. चित्रपटसृष्टीमध्ये मला रेखाजी यांची स्टाईल जास्त आवडते. कारण आजवर त्यांची फॅशन आणि स्टाईल कधीही बदललेली नाही. तीस वर्षांपूर्वी त्या जशा दिसायच्या तशाच त्या आजही दिसतात. त्यांनी त्यांची स्वतःची अशी वेगळी स्टाईल कायम ठेवलीय. एखाद्या स्टाईलमध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात हे माझ्यासाठी खूप महत्तवाचे आहे. कोणत्याही प्रकारची फॅशन ट्रेडिंग असेल आणि ती फॅशन मलाही आवडली असेल. मात्र जर मी त्यात कम्फर्टेबल नसेन तर मी तो ड्रेस घालणार नाही. ट्रेंड आणि फॅशनचा विचार न करता मला जे आवडेल तेच मी परिधान करेल. उगाच फॅशन आणि ट्रेंडच्या मागे धावण्यापेक्षा काही तरी स्वतःचे हटके स्टाईल करा आणि तुमची तीच स्टाईल एक फॅशन बनेल यातच खरी मजा आहे असे मला वाटते असे विद्याने सांगितले.