Join us

​म्हणून शहिद कपूरची पत्नी मीरा राजपूरतने रिलीजच्या आधीच पाहिला ‘रंगून’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2017 18:34 IST

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत व चॉकलेट ब्वॉय शाहिद कपूर यांचा आगामी चित्रपट रंगून सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटांची ...

बॉलिवूडची क्वीन कंगना रानौत व चॉकलेट ब्वॉय शाहिद कपूर यांचा आगामी चित्रपट रंगून सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटांची गाणी रिलीज झाल्यावर शाहिद कपूर व कंगना रानौतची जबरदस्त के मेस्ट्री चांगलीच चर्चेत आली आहे. अशातच शाहिदने माझे कंगनाशी मदभेद नसल्याचा खुलासा केला आहे. यामुळे मात्र शाहिद कपूरच्या पत्नीची डोकेदुखी वाढली असून तिने थेट आपल्या सासºयासोबत ‘रंगून’चा स्पेशल स्क्रिनिंग शो पाहिला असल्याच्या बातम्या येत आहेत. रंगून हा चित्रपट केवळ शाहिद कपूरसाठीच नव्हे तर कंगना रानौत व सैफ अली खानसाठी देखील महत्त्वाचा मानला जात आहे. विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘रंगून’ हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. यामुळे या चित्रपटाची केवळ सेंसॉर कापी तयार करण्यात आली आहे. फायनल प्रिंट अद्याप तयार करण्यात आली नाही. मात्र या चित्रपटाचा ट्रेलर व गाणी रिलीज झाल्यावर शाहिद कपूरच्या कुटुबीयांना हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली होती. बातम्यांनुसार पंकज कपूर यांना शाहिदचा रोल कसा आहे हे पाहण्याची प्रबळ इच्छा झाली. शाहिदची पत्नी मीरा राजपूतला देखील हा चित्रपट पाहण्याची संधीच मिळाली. यामुळे निर्मात्यांनी या चित्रपटाची मूळ कॉपी आपल्या कुटुंबाला दाखवावी असा आग्रह धरला. Read More : Ye Ishq Hai Song Launch : शाहिद कपूर-कंगना राणौत यांची Sizzling Chemistryपंकज कपूर व मीरा राजपूत यांच्यासाठी रंगूनचा स्पेशल शो एका मल्टीप्लेक्समध्ये ‘रंगून’चा स्पेशल शो आयोजित करण्यात आला होता. यात चित्रपटातील अन-अ‍ॅडिटेड भाग देखील दाखविण्यात आले. पंकज कपूर यांना यातील शाहिदची भूमिका आवडली असून हा चित्रपट हिट ठरेल असे सांगितले. तर मीराही शाहिदच्या रोलमुळे खुश असल्याचे सांगण्यात येते. नुकतेच या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे. यात शाहिद क पूर व कंगना रानौत यांच्यात इंटिमेट सिन्स दाखविण्यात आले आहेत.Read More : शाहिद कपूर म्हणतो, कंगना राणौत सोबत माझे मतभेद नाहीत!द्वितीय महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात शाहिद -कंगना-सैफ यांचा प्रेम त्रिकोण दाखविण्यात आला आहे. मात्र मीराने हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच का पाहिला याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. यामागे शाहिदचा पूर्व इतिहास तर नाही ना!  करिना कपूर व प्रियांका चोप्रा यांच्या सोबत एकाच चित्रपटात काम केल्यावर शाहिदचे अनेक किस्से प्रसिद्ध झाले आहे. हे तर मीराच्या कानावर आले नसावे. यामुळे मीराने सावधगीरी बाळागयाला सुरुवात केली का असाही अंदाज लावला जातोय.​Related Articles ‘रंगून’चा ट्रेलर: ‘वॉर’ आणि ‘रोमान्स’ एकाच ठिकाणी!!​‘रंगून’चे पहिले गाणे रिलीज : ‘ब्लडी हेल’मध्ये कंगनाचा लुक हंटरवालीचा