Join us  

म्हणून 'मणिकर्णिका'साठी कंगणा राणौतने घेतले इतके कोटींचे मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 9:13 AM

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीलाच ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं काहीसं कंगणा बाबतीतही घडलं. पहिल्यांदाच कान्समध्ये ...

यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सुरुवातीलाच ती आली, तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं असं काहीसं कंगणा बाबतीतही घडलं. पहिल्यांदाच कान्समध्ये हजेरी लावणाऱ्या कंगणाने आपल्या स्टाइल स्टेटमेंटने जगभरातील रसिकांची मनेही जिंकली.बॉलिवूड क्वीन कंगणाने भारतीय साडी परिधान करत रेड कार्पेटवर अवतरताच साऱ्यांच्या नजरा फक्त आणि फक्त कंगाणावरच खिळल्या होत्या. कान्समध्ये तिचा हा अंदाज क्वीनला शोभावा असाच होता.त्यामुळेच बॉलिवूडची ट्रेंडसेटर अभिनेत्री म्हणून कंगणा ओळखली जाते. आता कंगणा पुन्हा एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे.बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चाही सर्वाधिक रंगते. सर्वेत्रच कंगणा राणौतच बोलबाला पाहायला मिळत आहे.म्हणून हीच ती वेळ म्हणत तिने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'  सिनेमासाठी चक्क 10 कोटी इतकी मोठी रकम तिला मिळाली असल्याच्या चर्चा रंगत आहेत.मुळात कंगणा राणौत तिचे मानधन सिनेमाच्या  बजेटनुसार  ठरवत असते. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाचे मेकिंग बजेट 120 कोटींपेक्षा जास्त आहे. तेव्हाच कंगनाने जवळपास 10 कोटी रुपये घेतले असून अभिनेत्रींमध्ये सगळ्यांत जास्त मानधन घेणा-या अभिनेत्रींच्या यादीत आता कंगणाचे नाव सामिल झाले असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाच्या रिलीजला काही मुहूर्त सापडत नाही आहे.पुन्हा एकदा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटातील वीएफएक्सचे काम अजून बरेच बाकी आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटातील बराचा हिस्सा क्रोमावर शूट करण्यात आला आहे. त्यासाठी ग्राफिक्स आणि विज्युअल इफेक्ट्स तयार करण्यात येत आहेत. चित्रपटातील वीएफएक्सचे काम वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये देण्यात येते जेणेकरुन काम लवकरच संपेल. मात्र मणिकर्णिका चिपटाच्याबाबतीत असे झाले नाहीय. वीएफएक्सचे सर्व काम एकाच कंपनीला देण्यात आलेले आहे त्यामुळे चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात येते आहे. याआधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता.'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'चा दिग्दर्शक कृष  यांचा हा बॉलिवूडमधील दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा चान्स घ्यायचा नाही आहे. त्यामुळे कृष सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहेत.