Join us  

आजारपणामुळे बॉलिवूडपासून दूर होती सलमानची ही अभिनेत्री, आता दिसते अशी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 4:08 PM

या अभिनेत्रीला सलमाननेच बॉलिवूडमध्ये लाँच केले होते.

ठळक मुद्देस्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. यात ती न अधिक चालू शकत होती, ना अधिक वेळ उभी राहू शकत होती. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरने पीडित होती. हा एक रक्तासंदभार्तील आजार आहे.

ऐश्वर्या रॉयसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमान खानने एका नव्या अभिनेत्रीला लॉन्च केले होते. जी हुबेहुब ऐश्वयार्सारखी दिसत होती. तिचे नाव म्हणजे स्रेहा उल्लाल. २००५ मध्ये सलमान खानने स्रेहाला ब्रेक दिला होता. 

‘लकी- नो टाईम फॉर लव्ह’ या चित्रपटातून स्नेहाने सलमानसोबत डेब्यू केला होता. पण यानंतर स्रेहा बॉलिवूडमध्ये फार कमाल दाखवू शकली नाही. २००६ मध्ये सोहेल खानसोबत ‘आर्यन’मध्ये ती झळकली. यानंतर २०१० मध्ये ‘क्लिक’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत दिसली. पण हे दोन्ही चित्रपट दणकून आपटले. यानंतर स्नेहा साऊथच्या चित्रपटांकडे वळली. तेलगू आणि कन्नड चित्रपटांत ती दिसली. पण त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून ती अचानक चित्रपटांपासून दूर झाली.

स्नेहाला एका आजाराने ग्रासले होते. यात ती न अधिक चालू शकत होती, ना अधिक वेळ उभी राहू शकत होती. स्नेहा ऑटोइम्यून डिसऑर्डरने पीडित होती. हा एक रक्तासंदभार्तील आजार आहे. यामुळे स्नेहा प्रचंड अशक्त झाली होती. इतकी की, खूप वेळ आपल्या पायांवर उभीही राहू शकत नव्हती. त्याचमुळे ती चित्रपटांपासून दूर राहिली. 

स्नेहा शेवटची 2015 मध्ये बेजुबाँ या चित्रपटात झळकली होती. स्नेहा सध्या चित्रपटात काम करत नसली तरी ती काही ब्रँडसाठी जाहिरात करते. यासाठी तिला चांगले पैसे मिळतात. 

टॅग्स :सलमान खान