Join us  

वहिनी ऐश्वर्याच्या 'या' गोष्टीचा नंदेला येतो प्रचंड राग, सगळ्यांसमोर बच्चन बहूच्या कारनाम्याचा केला होता खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 4:17 PM

बच्चन कुटुंबियातली छोट्यातल्या छोट्या गोष्टीचीही चर्चा होते. त्यातही एक ऐश्वर्या आणि नणंद श्वेता नंदाचा एक किस्साही प्रचंड चर्चेत असतो.

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं.

बच्चन कुटुंबियातली छोट्यातल्या छोट्या गोष्टीचीही चर्चा होते. त्यातही एक ऐश्वर्या आणि नणंद श्वेता नंदाचा एक किस्साही प्रचंड चर्चेत असतो. श्वेता नंदाही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. श्वेताही अभिनय क्षेत्रात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. श्वेता आणि तिचे पती निखिल नंतदासह तिचा घटस्फोट झाल्याचे बोलले जाते.

श्वेताने इस्टाग्रामवर देखील नंदा आडनाव काढत केवळ श्वेता बच्चन ठेवले आहे.आता दिल्ली सोडून श्वेताने थेट मुंबई गाठत आई-वडिलांसह राहणे पसंत केले आहे. श्वेता आणि निखिल नंदा यांना दोन मुलं आहेत. मुलगी नव्या नवेली आणि अगस्त्य असे त्यांच्या मुलांची नावं आहेत.श्वेता आपल्या मुलांसह सध्या आई-वडिलांच्याच घरी राहत आहे. अशात मात्र वहिनी ऐश्वर्या रायची एक सवयीमुळे श्वेता हैराण असते.

एका चॅट शोमध्ये जेव्हा श्वेता बच्चनला ऐश्वर्याबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली की तिला ऐश्वर्याच्या सर्व गोष्टी आवडतात पण तिच्या एका सवयीमुळे तिला खूप वाईट वाटते. ऐश्वर्या फोन व मेसेजचे उत्तर कधीच देत नाही. यामुळे मला तिच्यावर खूप राग येतो पण आजपर्यंत फोन आणि मेसेजला उत्तर का देत नाही हे माहित नाही. याचदरम्यान करणने श्वेताला अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये उत्कृष्ट कलाकार कोण असा प्रश्न विचारला. यावेळी श्वेताने भावाची बाजू घेत अभिषेकचं नाव घेतले होते.

विशेष म्हणजे श्वेताचे अमिताभसह चांगले नाते आहे. नेहमीच सोशल मीडियावर अमिताभ यांचे आपल्या लेकीवर असलेले जीवापाड प्रेम पाहायला मिळते. लेकीसोबतच्या प्रत्येक फोटोमध्ये त्यांच्यातला दडलेला हळवा अन् तितकाच भावनिक बाबा पाहायला मिळतो. मात्र आई जया बच्चनसह श्वेताचे फारसे पटत नाही.नेहमी या दोघींचे खटके उडत असतात.

 

याला कारण म्हणजे केवळ जया बच्चनमुळेच श्वेताला वयाच्या २२ व्या वर्षी लग्न करावे लागले. ईच्छा नसताना तिने हे लग्न केले. लग्न जरी केले असले तरी तिच्या आयुष्यात ती खुश नव्हती. त्यामुळे श्वेताचे आयुष्याची वाट लागली यासाठी आई जया बच्चन जबाबदार असल्याचे ती समजते.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चन