Join us  

Birthday Special : पहिल्या पत्नीला अंधारात ठेवून उदित नारायण यांनी केले होते दुसरे लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 11:40 AM

बॉलिवूडच्या अनेक रोमॅन्टिक गाण्यांना आवाज देणारे गायक उदित नारायण यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्देकोर्टाने त्यांना दोन्ही पत्नींना सोबत ठेवण्याचे आदेश दिले होते.  

बॉलिवूडच्या अनेक रोमॅन्टिक गाण्यांना आवाज देणारे गायक उदित नारायण यांचा आज वाढदिवस. गायक उदित नारायण यांचा जन्म 1 डिसेंबर 1955 मध्ये झाला. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘सिंदूर’ या सिनेमातून केली होती. हा एक नेपाळी सिनेमा होता. 1978 मध्ये ते मुंबईला आले. बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी त्यांना प्रचंड मोठा संघर्ष करावा लागला.

सुमारे 10 वर्षे संघर्ष केल्यानंतर त्यांना पहिला मोठा ब्रेक मिळाला. होय, ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातील ‘पापा कहते हैं’ हे गाणे त्यांनी गायले आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. उदित नारायण यांनी अनेक गाणी गायलीत. यातली बहुतांश रोमॅन्टिक गाणी होती. विशेष म्हणजे, रोमॅन्टिक गाण्यांना आवाज देणा-या उदित यांचे खासगी आयुष्यही तेवढेच रोमॅन्टिक आहे.

( उदित नारायण- रंजना झा)

आपल्या रोमॅन्टिक गाण्यांमुळे उदित नारायण चर्चेत असत. पण लग्नामुळे उदित नारायण कमालीचे चर्चेत आले होते. त्यांनी दोन लग्न केलीत. पहिले लग्न रंजना झा हिच्यासोबत केले आणि दुसरे लग्न दीपा हिच्याशी. सिंगर व होस्ट आदित्य नारायण हा उदित आणि दीपा यांचा मुलगा आहे. 

उदित यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता शिवाय त्यांना कोणतीही कल्पना न देता दीपा यांच्याशी लग्न केले. या लग्नाची चर्चा झाली नसेल तर नवल.

सुरुवातीला उदित यांनी त्यांच्या पहिल्या पत्नीला खोट ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रंजना झा यांनी कोर्टात धाव घेतली. त्यांनी कोर्टात उदित यांच्याशी झालेल्या लग्नाचे फोटो आणि कागदपत्र सादर केली. त्यानंतर उदित यांनी रंजना झा यांच्याशी लग्न केल्याचे मान्य केले. त्यावेळी कोर्टाने त्यांना दोन्ही पत्नींना सोबत ठेवण्याचे आदेश दिले होते.  

टॅग्स :उदित नारायण