Join us  

सोनू निगमने मुरगळला चाहत्याचा हात...पाहा, व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 10:35 AM

बॉलिवूड सिंगर सोनू निगम अलीकडे काहीना ना काही कारणावरून कायम चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोनूने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर एका चाहत्याचा हात त्याने मुरगळला.

ठळक मुद्देसोनूच्या या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना सोनूचे हे वागणे खटकले असून काहींनी मात्र त्याची बाजू घेत सेलिब्रिटींसोबत योग्य वागण्याचा सल्ला दिला आहे.

बॉलिवूड सिंगर सोनू निगम अलीकडे काहीना ना काही कारणावरून कायम चर्चेत असतो. आता तो पुन्हा एकदा चर्चेत आहे.  सोनूने काय करावे, तर चक्क सर्वांसमोर एका चाहत्याचा हात त्याने मुरगळला. होय, त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.अलीकडे सोनू एका कार्यक्रमात सहभागी झाला. या कार्यक्रमात त्याला चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. कार्यक्रम संपवून सोनू बाहेर येताच, चाहत्यांनी त्याला घेरले. अनेक जण त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचे प्रयत्न करू लागले. यादरम्यान एक चाहता समोर आला आणि  सोनूच्या खांद्यावर हात टाकून सेल्फी घेऊ लागला. कदाचित सोनूला हे आवडले नाही. त्याने लगेच त्या चाहत्याचा हात आपल्या खांद्यावरून काढला आणि तो जोरात मुरगळला. अर्थात यानंतर सोनूने लगेच चाहत्याचा हात सोडला आणि हसत हसत त्याच्यासोबत सेल्फी काढला. प्रकरण तापण्याआधीच सोनूने हसतहसत आपली बाजू सांभाळली.

तूर्तास सोनूच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना सोनूचे हे वागणे खटकले असून काहींनी मात्र त्याची बाजू घेत सेलिब्रिटींसोबत योग्य वागण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हाला या घडलेल्या प्रकाराबद्दल काय वाटते, जरूर लिहा.वयाच्या चौथ्या वर्षीपासून सोनूने गायनाची सुरुवात केली. चार वर्षांचा असताना त्याने ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं  वडील आगम कुमार निगम यांच्यासोबत स्टेजवर सादर केले होते. त्यानंतर तो नेहमीच वडिलांसोबत स्टेज परफॉर्मन्स देऊ लागला. १८ वर्षांचा असताना सोनू त्याच्या वडिलांसोबत मुंबईत आला आणि उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे त्याने संगीत शिकायला सुरुवात केली. आज सोनू बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याला त्याच्या गाण्यांसाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोनू आज  एक गाणे गाण्यासाठी करोडो रुपये घेतो असे म्हटले जाते. 

टॅग्स :सोनू निगम