Join us  

गायिका रिवा राठोड यांचे नवे गाणे लाँच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 6:27 PM

रिवा राठोड यांच्या ‘सानवाल’ या नव्या गाण्याचे लाँचिंग मुंबईत अनेक मान्यवर, दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या स्वररचनांसह गायिका रिवा राठोड यांच्या गायनाने उपस्थितांना मोहित केले. 

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड आणि पत्नी सोनाली राठोड यांची कन्या रिवा राठोड यांच्या ‘सानवाल’ या नव्या गाण्याचे लाँचिंग मुंबईत अनेक मान्यवर, दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्या स्वररचनांसह गायिका रिवा राठोड यांच्या गायनाने उपस्थितांना मोहित केले. 

    या कार्यक्रमावेळी रिवा राठोड म्हणाल्या,‘लता दीदी माझ्यासाठी पूज्यनीय आहेत. त्या एक चालतं बोलतं संगीताचं विद्यापीठच आहेत. मी लता दीदी आणि हृदयानाथ मंगेशकर यांची गाणी ऐकतंच मोठी झाले. त्यांची गाणी माझ्यासाठी कायम प्रेरणास्थानी असतात. त्या माझ्या कॉन्सर्टला असणं हा मी माझा बहुमान समजते. तसेच मी उस्ताद सलामत अली खान साहेब यांची खूप मोठी चाहती आहे. काही महिन्यांपूर्वी मी त्यांनी गायलेलं सान्वाल ऐकलं आणि अलौकिक अशा गीतप्रकाराच्या प्रेमातच पडले. मी ते माझ्या स्वत:च्या शैलीत गायले आणि उस्ताद झाकीर हुसैन यांच्या साथीने रेकॉर्ड केले. त्यांनीच मला ते रसिकांसमोर आणण्यासाठी प्रोत्साहन दिले. हे पारंपारिक गाणं माझ्यासाठी आव्हानात्मक ठरलं.’ यावेळी पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर, अमृता फडणवीस, जुही चावला, उषा मंगेशकर, हरिहरण, सुरेश वाडकर, जतिन पंडित, श्रवण राठोड, इस्माईल दरबार, आदिनाथ मंगेशकर, संजीव कपूर आदींनी उपस्थिती नोंदवली होती.

टॅग्स :रूप कुमार राठोडहृदयनाथ मंगेशकर