Join us  

'साहो'साठी श्रद्धा आणि प्रभासने एकमेकांना अशी केली मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:00 AM

प्रभास सध्या त्याचा आगामी अॅक्शन सिनेमा साहोला घेऊन चर्चेत आहे.‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे.  या सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर साऊथमध्ये डेब्यू करतेय

ठळक मुद्देतेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे 'साहो' हा भारतील तीन भाषेत शूट होणार पहिला सिनेमा आहे

प्रभास सध्या त्याचा आगामी अॅक्शन सिनेमा साहोला घेऊन चर्चेत आहे.‘साहो’मध्ये प्रभास एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे.  या सिनेमातून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर साऊथमध्ये डेब्यू करतेय. यात श्रद्धा डबलरोल साकारताना दिसणार आहे. केवळ इतकेच नाही तर प्रभासच्या तोडीला तोड असे अ‍ॅक्शन सीन्स करतानाही दिसणार आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तेलगू भाषा प्रभासला चांगली अवगत आहे. त्यामुळे शूटिंग दरम्यान प्रभास श्रद्धाला तेलगू भाषेचे उच्चार अधिक चांगले करण्यास मदत करायचा. तर श्रद्धा प्रभासला हिंदी भाषेचे उच्चार सुधारण्यास मदत करायची. दोघांची सेटवर चांगली गट्टी जमली होती. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने प्रभाससाठी खास मुंबईवरुन तिळाचे लाडू पाठवले होते. 

 'साहो' हा भारतील तीन भाषेत शूट होणार पहिला सिनेमा आहे. काही दिवसांपूर्वीच साहोचा टीझर आऊट झाला आहे. यात प्रभास स्टायलिश लूकमध्ये दिसला. .‘साहो’मध्ये प्रभास प्रेक्षकांना एंटरटेनमेंटचा डबलडोज देणार आहे. जगातील लोकप्रिय असलेल्या बियॉन्सेच्या सुपरहिट गाण्यांवर प्रभास थिरकताना दिसणार आहे.  हा डान्स नंबर कार्निव्हल थीमवर आधारित असेल. वैभवी मर्चंट या गाण्याची कोरिओग्राफी करणार आहे. एमी जैक्सन, अरूण विजय आणि आदित्य श्रीवास्तव सारखे कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवणार आहेत. सिनेमातील काही भागांचे शूटिंग अबू धाबीमध्ये करण्यात आले आहे. टीझर आऊट झाल्यापासून प्रभासचे फॅन सिनेमाच्या रिलीज होण्याती वाट पाहत आहेत. 15 ऑगस्ट 2019 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :प्रभासश्रद्धा कपूर