Join us

​फरहान अख्तरसोबतच्या रिलेशनशिपवर श्रद्धा कपूर म्हणाली, ‘फिक्शन’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 10:50 IST

श्रद्धा कपूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफबद्दलच अधिक चर्चेत आहे. आधी आदित्य राय कपूर, मग फरहान अख्तर आणि ...

श्रद्धा कपूर सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफबद्दलच अधिक चर्चेत आहे. आधी आदित्य राय कपूर, मग फरहान अख्तर आणि आता दिग्दर्शक मोहित सूरी यांच्यासोबत श्रद्धाचे नाव जोडले गेले, जातेय. आदित्य राय कपूर तर भूतकाळ झाला. पण फरहान व मोहित सूरी हा श्रद्धाचा वर्तमान आहे. म्हणूनच अलीकडे एका मुलाखतीत श्रद्धाला याबद्दल विचारण्यात आले. पहिला प्रश्न होता मोहित सूरीबद्दल. मोहित सूरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा श्रद्धाचा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या सेटवर श्रद्धा व मोहित सूरी यांचे ‘सूर’ चांगलेच जुळल्याची चर्चा आहे. या चर्चेबद्दल श्रद्धाला छेडले गेले. तुझ्या व मोहित सूरीच्या लिंकअपच्या बातम्या येत आहेत, हे खरे आहे का? असे तिला विचारले गेले. यावर श्रद्धाला आश्चर्याचा धक्काच बसला. अशी काही अफवा आहे? मी ऐकली नाही, असे ती म्हणाली. यानंतर काय तर, अशा प्रश्नांकडे मी दुर्लक्ष करणे पसंत करते, असे सांगून तिने या प्रश्नाला बगल दिली.ALSO READ : मोठ्या पडद्यावर सायना नेहवाल साकारणार श्रद्धा कपूरयानंतर श्रद्धाला फरहान अख्तरबद्दल विचारण्यात आले. यावर श्रद्धा काय म्हणाली माहितीय? ‘फिक्शनचा स्तर एका अविश्वसनीय उंचीवर जाऊ शकतो. मी त्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या कामावर फोकस करते,’ असे ती म्हणाली.फरहान तुझा मित्र आहे का? असा प्रश्न यानंतर श्रद्धाला विचारण्यात आला. यावर मात्र श्रद्धाने बरेच प्रामाणिक उत्तर दिले. होय, फरहान माझा मित्र आहे, असे ती म्हणाली. शेवटी काय तर, फरहानसोबत माझी मैत्री आहे, हे कबुल करणे काही कमी नाही. होय ना, श्रद्धा? गेल्या अनेक दिवसांपासून श्रद्धा व फरहानच्या सीक्रेट अफेअर्सची चर्चा आहे.