शाहरुख खान मे महिन्यात सुरु करणार या चित्रपटाचे शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 10:10 IST
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये झिरो चित्रपट रिलीज होणार आहे. डीएनएच्या ...
शाहरुख खान मे महिन्यात सुरु करणार या चित्रपटाचे शूटिंग
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये झिरो चित्रपट रिलीज होणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार काही दिवसांआधीच शाहरुख खानने सांगितेल आहे की तो झिरोनंतर राकेश शर्मा यांच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची शूटिंग यावर्षीच्या मे महिन्यांपासून सुरू होणार आहे. चित्रपटाशी संबंधित एक सूत्रांने डिएनएला सांगितले की, शाहरुख खान यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत झिरो चित्रपटाची शूटिंग पूर्ण करणार आहे. यानंतर तो लगेचच मे महिन्यांत सैल्यूट चित्रपटाच्या तयारीला लागणार आहे. 3 महिने तायरी केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तो सैल्यूटच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. राकेश शर्मांनी या चित्रपटाची ऑफर आधी आमिर खानला दिली होती. मात्र काही कारणांमुळे आमिरने तो नकारला. आमिरनेच मेकर्सना स्वत:या भूमिकेसाठी शाहरुखचे नाव सुचवले होते. आमिरने या चित्रपटला नकार दिल्यानंतर प्रियंका चोप्रानेसुद्धा हा चित्रपट सोडून दिल्याचे समजते आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार होती. आता निर्माते नवा अभिनेत्रीच्या शोधात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान यावर्षाच्या अखेरीस सैल्यूटचे शूटिंग पूर्ण करणार आहे. 2019मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ALSO READ : रेणुका शहाणे, शाहरुख खान आणि सचिन खेडेकर यांचा फोटो झाला व्हायरलशाहरुख खान झिरोमध्ये बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’या चित्रपटात अनेक व्हिज्युअल इफेक्ट्स दिसणार आहेत. शाहरूखची कंपनी रेड चिलीज् व्हीएफएक्सकडे हे काम आहे.शाहरूखच्या या चित्रपटासाठी विदेशातून एक्सपर्ट बोलवले गेलेत, असेही कळतेय. या चित्रपटात शाहरुख खानशिवाय कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या तिघांची जोडी प्रेक्षकांना इतकी पसंत आली होती की, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. चित्रपटाचे दिग्दर्शन आनंद एल. राय करीत आहेत.