शूजीत सरकारने इरफानच्या तब्येती विषयी दिली 'ही' माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 12:07 IST
गेल्या अनेक दिवसांपासून मीडियामध्ये इरफान खानच्या आजारपणाबाबत अनेक चर्चेत होतायेत. काही दिवसांपूर्वी इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिग्दर्शक ...
शूजीत सरकारने इरफानच्या तब्येती विषयी दिली 'ही' माहिती
गेल्या अनेक दिवसांपासून मीडियामध्ये इरफान खानच्या आजारपणाबाबत अनेक चर्चेत होतायेत. काही दिवसांपूर्वी इरफानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिग्दर्शक शूजीत सरकारने अक्टूबर चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान मीडियाला इरफानच्या तब्येतीच अपडेट्स दिले. काही दिवसांपूर्वी इरफानला आजारपणामुळे कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर इरफानने ट्विटरवरुन एक पोस्ट लिहिली होती की, ''मी सध्या एका गंभीर आजाराशी लढा देत आहे. मी आयुष्यात कधीच तडतोड स्वीकारली नाही. कायम मला हव्या त्या गोष्टीसाठी भांडत आलो. भविष्यातही माझे भांडण असेच सुरुच राहिल. माझे कुटुंब आणि मित्र माझ्यासोबत आहेत. आम्ही यातून मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत आहोत. कृपया कुठलेही तर्क वितर्क काढू नका. सर्व वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट्स येताच, मी स्वत:च तुम्हाला सर्व कहाणी सांगेल. तोपर्यंत माझ्यासाठी प्रार्थना करा.'' शूजीत सरकार मीडियाशी बोलताना म्हणाले की, तुम्ही काळजी करण्याचे अजिबात कारण नाही. मी दोनदा त्यांना रुग्णालयात जाऊन भेटून आलो आहे. ते खूप लवकर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायला तो हजर असेल. तोपर्यंत कोणत्याच अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. ALSO READ : आजारपणाचे गूढ वाढत असतानाच इरफान खानचा ‘हा’ फोटो आला समोर!याआधी इरफान खानची पत्नी सुतपाने तिच्या पोस्ट मध्ये लिहिले आहे की, माझा बेस्ट फ्रेंड आणि जोडीदार हा एक लढय्या असून तो अतिशय चांगल्याप्रकारे प्रत्येक गोष्टीचा सामना करत आहे. मी सध्या कोणाचे फोन उचलत नाहीये, तसेच मेसेजने रिप्लाय देत नाहीये. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते. इरफानसाठी तुम्ही सगळे ज्या प्रार्थना करत आहात, त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. मला आणि माझ्या साथीदाराला या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देवाने जी ताकद दिली आहे, त्यासाठी मी देवाची ऋणी आहे. सध्या माझे संपूर्ण लक्ष इरफानकडे आहे. गेल्या काही दिवसांपासून इरफानला ब्रेन ट्युमर किंवा ब्लड कॅन्सर झाले असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.