Join us  

Shocking! 'सुशांतची बहीण करायची वाईट पद्धतीनं स्पर्श', रिया चक्रवर्तीचा खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 7:04 PM

रियाने सुशांतच्या निधनापूर्वी त्याच्या घरात घडलेली धक्कादायक बाब सांगितली आहे. यात तिने सुशांतची बहिण प्रियंकाचा उल्लेख केला आहे.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोप प्रत्यारोपांसोबत आणि खुलासे पटनामध्ये रिया चक्रवर्ती विरोधात तक्रार झाल्यानंतर समोर येऊ लागले आहेत. आता सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीने त्याची बहिण प्रियंकावर खळबळजनक आरोप केले आहेत. रियाने सुशांतच्या निधनापूर्वी त्याच्या घरात घडलेली धक्कादायक बाब सांगितली आहे. यात तिने सुशांतची बहिण प्रियंकाचा उल्लेख केला आहे.रियाने सांगितले की, सुशांतसोबतच्या नात्याची सुरुवात झाल्यानंतर घरी राहायला गेले होते. त्यावेळी सुशांतची बहीण प्रियंका आणि तिचा पती सिद्धार्थ सुशांतसोबतच राहत होते. एप्रिल 2019 च्या एका रात्री रिया आणि प्रियंका एका पार्टीत गेल्या होत्या. त्यावेळी प्रियंकाने प्रमाणापेक्षा जास्त मद्याचे सेवन केले होते. नशेत प्रियंका पुरुष आणि महिलांसोबत विचित्र चाळे करत होती.

दुसऱ्या दिवशी शूटिंगला जायचे असल्यामुळे मी त्या पार्टीतून लगेच निघून गेली. पण पार्टीमध्ये प्रियंका मद्याचे सेवन करत होती. मी घरी आल्यानंतर सुशांतच्या बेडवर झोपले होते. रात्री मला अचानक जाग आली तेव्हा बेडवर प्रियंका झोपली होती आणि ती मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होती. हे सर्व पाहून रिया घाबरली आणि तिने तिला खोलीतून बाहेर जाण्यास सांगितले. या घटनेनंतर रिया सुशांतच्या घरातून निघून गेली. त्यानंतर रियाने सुशांतला याबद्दल सांगितले.

त्यावरून सुशांतचे बहिणीसोबत भांडण झाले. या घटनेनंतर रिया व सुशांतच्या कुटुंबातील नाते खराब झाले. याच कारणामुळे सुशांतच्या अंतिम संस्कारावेळी वीस जणांच्या नावाची यादी बनवली होती त्यात रियाचे नाव नव्हते.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतरिया चक्रवर्ती