SHOCKING!! सिद्धार्थ राय कपूरने सोडले ‘डिस्रे इंडिया’चे सीईओ पद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2016 15:46 IST
विद्या बालनचा पती सिद्धार्थ राय कपूर हा बॉलिवूडचा एक यशस्वी निर्माता लवकरच स्वत:चा नवा व्यवसाय सुरु करतो आहे. यामुळे ...
SHOCKING!! सिद्धार्थ राय कपूरने सोडले ‘डिस्रे इंडिया’चे सीईओ पद!
विद्या बालनचा पती सिद्धार्थ राय कपूर हा बॉलिवूडचा एक यशस्वी निर्माता लवकरच स्वत:चा नवा व्यवसाय सुरु करतो आहे. यामुळे त्याने डिस्ने इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे पदभार सोडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या डिसेंबरनंतर सिद्धार्थ या पदावर नसेल. डिस्नेचे आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अॅण्डी बर्ड यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. महेश समत हे सिद्धार्थची जागा घेणार आहेत. समत यांनी २००८ ते २०१२ या कालावधीसाठी डिस्ने इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला होता.अॅण्डी बर्ड यांनी त्यांच्या कर्मचा-यांना ई मेलद्वारे ही माहिती दिली आहे. सिद्धार्थला त्याला स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याची महत्वाकांक्षा आहे. सुमारे वर्षभरापूर्वी त्याने याबाबत कल्पना दिली होती. याच कारणामुळे त्याने डिसेंबर महिन्यात संपणा-या त्याच्या कराराचे नुतनीकरण न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही त्याच्या जागी एका योग्य व्यक्तिच्या शोधात होतो. सिद्धार्थच्या जागी आता महेश समत हा पदभार सांभाळतील, असे अॅण्डी बर्ड यांनी या ईमेलमध्ये म्हटले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत डिस्नेला भरीव संधी उपलब्ध करून देण्यात सिद्धार्थचा मोलाचा वाटा आहे. सिद्धार्थच्या नेतृत्वाखाली डिस्नेने ‘पीके’, ‘जंगल बुक’ हे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. लहान मुलांना आवडणा-या कार्टुन चॅनेलमध्ये आजही डिस्ने पहिल्या स्थानावर आहे. सिद्धार्थने डिस्नेला दिलेल्या सेवेबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत, असेही बर्ड यांनी ई मेलमध्ये म्हटले आहे. सिद्धार्थ ‘द फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन प्रोड्यूसर’च्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार,अशी अलीकडे चर्चा आहे. अर्थात याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.