Join us  

shocking !! कपिल शर्मा सुनील ग्रोवरला म्हणाला, तू माझा नोकर; विमानात केली मारहाण!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2017 7:48 AM

सध्या यशाच्या शिखरावर असलेला कॉमेडियन कपिल शर्मा याने शनिवारी सकाळी आपल्या गर्लफ्रेन्डचा फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. ...

सध्या यशाच्या शिखरावर असलेला कॉमेडियन कपिल शर्मा याने शनिवारी सकाळी आपल्या गर्लफ्रेन्डचा फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला. पण याच रात्री कपिलबद्दल एक शॉकिंग बातमीही येऊन धडकली. होय, ही बातमी होती,कपिलने त्याचा सहकलाकार सुनील ग्रोवर याला मारहाण केल्याची.घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. कपिल शर्मा आपल्या टीमसोबत आॅस्ट्रेलियावरून दिल्लीमार्गे मुंबईला परतत असताना ही घटना घडली. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवरही होता. सिडनी आणि मेलबर्न येथील शोनंतर ‘दी कपिल शर्मा शो’ची अख्खी टीम बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते. कपिल शर्मा नशेत धूत होता. नशेत असतानाच त्याची व सुनीलची कशावरून तरी बाचाबाची झाली. यानंतर कपिलने सुनीलला शिवीगाळ करत मारहाण केली. कपिला तो नाही- नाही ते बोलला. तू कोण आहेस? तुझा शो फ्लॉप झाला होता. तू माझा नोकर आहे. तू आॅस्ट्रेलियात एकट्याने शो केलास, तोही फ्लॉप होता, असे काय काय ते कपिल शर्मा सुनीलला बोलला.ALSO READ : कोण आहे कपिल शर्माची गर्लफ्रेड गिनी?हिच्यासह लवकरच थाटणार लग्न रिपोर्टनुसार, या घटनेमुळे विमानातील काही प्रवासी घाबरले. त्यांनी विमानाच्या इमर्न्जन्सी लँडिंगची मागणी केली. मात्र कपिलच्या टीममधील अन्य सदस्यांनी मध्यस्थी करून कपिलला कसेबसे शांत केले. कपिलच्या या अपमानास्पद वागणुकीमुळे सुनील प्रचंड संतापला आहे. सूत्रांच्या मते, या घटनेमुळे दु:खी सुनील लवकरच कपिलचा शो सोडू शकतो. कपिलच्या टीममधील अन्य सदस्यही नाराज असल्याचे कळतेय. चित्रपटात काम केल्यानंतर कपिल त्यांना ‘टीव्हीवालों’ म्हणून बोलवायला लागला होता.दरम्यान या प्रकरणाबद्दल विचारले असता, मला काहीही आठवत नाही. आमच्यात नेहमीच वाद होतात. आम्ही नेहमीच भांडतो पण आमचे हे भांडण ‘हेल्दी’ भांडण असते, असे कपिल म्हणाला.