Join us

Shocking : पंधरा वर्षीय मुलाने सुष्मिता सेनसोबत केली छेडछाड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 21:56 IST

सोशल मीडियावर ‘मी टू’ हे कॅम्पेन सुरू होताच एकापाठोपाठ एक सेलिब्रिटींनी आपल्यासोबत झालेल्या छेडछाडीच्या आणि लैंगिकशोषणांच्या घटनांचा खुलासा केला. ...

सोशल मीडियावर ‘मी टू’ हे कॅम्पेन सुरू होताच एकापाठोपाठ एक सेलिब्रिटींनी आपल्यासोबत झालेल्या छेडछाडीच्या आणि लैंगिकशोषणांच्या घटनांचा खुलासा केला. मिस युनिव्हर्स राहिलेल्या अभिनेत्री सुष्मिता सेननेदेखील तिच्यासोबत झालेल्या एका अशाच घटनेचा धक्कादायक खुलासा केला आहे. सुष्मिताने मीडियासमोर याबाबतची स्पष्टोक्ती देऊन अनेकांना धक्का दिला आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या एका रिपोर्टनुसार, एका इव्हेंटदरम्यान सुष्मिताला देशात महिलांच्या सुरक्षिततेविषयी विचारले असता, तिने म्हटले की, ‘छोट्या शहरांमध्ये नक्कीच महिला सुरक्षित नाहीत. कारण त्यांच्याविषयी बातमी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. मात्र मी एक महिला आहे, अशी महिला जी गेल्या २५ वर्षांपासून लोकांच्या नजरेत आहे. वास्तविक आमच्या सुरक्षेसाठी आमच्यासोबत बॉडीगार्ड्स असतात. परंतु एक महिला असल्यामुळे अवतीभोवती दहा बॉडीगार्ड्स असतानाही आम्हाला समाजातील अशा कित्येक पुरुषांचा सामना करावा लागतो, जे उद्धटपणा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, हे कशाप्रकारे घडत असते. पुढे सुष्मिताने तिचा स्वत:चा एक अनुभव शेअर करताना म्हटले की, ‘यावेळेस अंतर वयाचे होते. सहा महिन्यांपूर्वी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये मी उपस्थित होती. त्याठिकाणी तुम्ही मीडियावालेही उपस्थित होते. त्याठिकाणी एका पंधरा वर्षीय मुलाने माझ्याशी छेडछाड केली. त्याला असे वाटले की, याठिकाणी बरेचसे पुरुष उपस्थित आहेत, त्यामुळे मी केलेले कृत्य तिच्या लक्षात येणार नाही. त्यामुळेच मी नेहमी सांगत आली की, सेल्फ डिफेन्स शिकायलाच हवे. त्यामुळे तुम्ही लगेचच अलर्ट होता. सुष्मिताने पुढे सांगितले की, ‘मी त्या मुलाचा हात धरला अन् जेव्हा मी त्याला बाहेर ओढले तेव्हा मला धक्काच बसला. मी जर ठरविले असते तर बरेच काही करू शकले असते. परंतु तो पंधरा वर्षांचा मुलगा होता. त्यामुळे मी त्याच्या मानेला पकडले अन् जमावासमोरच त्याला वॉकला घेऊन गेले अन् म्हटले, ‘जर मी याठिकाणी बोभाटा केला तर तुझे आयुष्य संपून जाईल.’ यावर त्याने म्हटले की, मी काहीच केले नाही. तेव्हा मी त्याला म्हटले, तू तुझी चूक मान्य कर. त्यानंतर त्याने त्याची चूक मान्य केली. तसेच म्हटले की, शपथ घेऊन सांगतो की, पुन्हा असे कधीच करणार नाही. तेव्हा मी त्याला म्हटले, जर तू पुन्हा असे कोणासोबतही केले तर खबरदार... मी तुझा चेहरा बघितलेला आहे. आता येथून निघून जा. पुढे सुष्मिताने सांगितले की, ‘हाच तर फरक आहे. त्या पंधरा वर्षांच्या मुलाला हे कोणीच शिकविले नाही की, हे काही मनोरंजन नाही. तर ही एक खूप मोठी चूक आहे. ज्यामुळे आयुष्य उद््ध्वस्त होऊ शकते. आयुष्याला कायमचा कलंक लागू शकतो.