Join us  

धक्कादायक खुलासा...! बऱ्याच कालावधीपासून रिलेशनशीपमध्ये आहे ही बॉलिवूड अभिनेत्री, अडीच वर्षांची आहे मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 4:58 PM

बॉलिवूडमधील ही अभिनेत्री बऱ्याच कालावधीपासून लिव-इन-रिलेशनशीपमध्ये असून तिला अडीच वर्षांची मुलगीदेखील आहे.

अभिनेत्री माही गिल देव डी, साहेब बीवी और गुलाम आणि नॉट ए लव स्टोरी या चित्रपटांमधील बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. तिच्या बोल्ड भूमिका व अंदाजामुळे तिचे चित्रपट चर्चेत असतात. एका मुलाखतीत माही गिल हिने धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की ती बऱ्याच कालावधीपासून लिव इन रिलेशनशीपमध्ये आहे आणि तिला एक मुलगी देखील आहे.

डेक्कन क्रोनिकलला दिलेल्या मुलाखतीत माही गिलने तिचा आगामी चित्रपट फॅमिली ऑफ ठाकुरगंजवर चर्चा केली. या दरम्यान माही गिलने आपल्या रिलेशनशीप व पर्सनल लाइफबद्दल सांगितलं. आतापर्यंत तिच्या खासगी आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना काहीही माहित नव्हतं. मात्र पहिल्यांदा माही गिलने सांगितलं की, मी विवाहित नाही. पण, माझा बॉयफ्रेंड आहे. 

तिने पुढे सांगितलं की, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण लग्न केले किंवा नाही केलं त्यामुळे आमच्या नात्यात काहीच फरक पडणार नाही. मला आझादी व स्पेस या दोन्ही गोष्टींची गरज आहे. आम्ही दोघे एकमेकांचा आदर करतो. हो. आम्ही लिव इन रिलेशनशीपमध्ये राहतो आहे. लग्न देखील लवकरच करू.

माहीने तिला अडीच वर्षांची मुलगी असल्याचं सांगितलं. पण तिने ती मुलगी दत्तक घेतलीय की तिला जन्म दिला हे सांगितलं नाही. तिचं नाव वेरोनिका आहे. माहीने तिच्याबद्दल सांगितलं की, माझी मुलगी माझ्यासोबत राहते. माझी आंटी तिची काळजी घेते. मीदेखील कामाच्यावेळी मुंबईतच राहण्याचा प्रयत्न करते.

माही गिल नुकतीच वेब सीरिज अपहरणमध्ये दिसली होती.