Join us

Shocking : अमिताभ बच्चनच्या ठोशामुळे शत्रुघ्न सिन्हाचा चेहरा झाला होता रक्तबंबाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 16:06 IST

बॉलिवूडपटांमध्ये अ‍ॅक्शन सीन्सचे प्रचंड महत्त्व असते. फाइट सीन्स याच कॅटेगिरीत चित्रित केले जातात. सिल्व्हर स्क्रीनवर या सीन्सला प्रचंड पसंती ...

बॉलिवूडपटांमध्ये अ‍ॅक्शन सीन्सचे प्रचंड महत्त्व असते. फाइट सीन्स याच कॅटेगिरीत चित्रित केले जातात. सिल्व्हर स्क्रीनवर या सीन्सला प्रचंड पसंती दिली जाते. काही सीन्स असे असतात की, चाहत्यांच्या अंगावर शहारे उभे राहतात. परंतु हे सीन्स चित्रित करताना काय कसरत करावी लागते? हे केवळ कलाकारांनाच चांगले ज्ञात असते. कारण एक चूक जिवावर बेतू शकते. असाच काहीसा किस्सा अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्याबाबतीत घडला आहे. शूटिंगदरम्यान अमिताभने शत्रुघ्न यांना असा एक ठोसा मारला, ज्यामुळे त्यांचा ओठ फाटला होता. हा किस्सा खूप जुना आहे. एका टीव्ही चॅनेलवर मुलाखत देताना शत्रुघ्न सिन्हा यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यांना विचारण्यात आले की, ‘एका चित्रपटादरम्यान अमिताभ यांनी शत्रुघ्न सिन्हा यांना चुकीने एवढ्या जोरात ठोसा मारला होता की ज्यामुळे त्यांचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता, हे खरं आहे काय?’ याचे उत्तर देताना शॉटगन शत्रुघ्न यांनी सांगितले की, ‘हे चुकून घडले होते. तेव्हा फाइट सीन चित्रित केला जात होता. अमिताभ हा सीन्स करण्यासाठी घाई करीत होते. तेव्हा अचानकच त्यांनी मला ठोसा मारला. मला हा सीन्स सुरू आहे, हे माहीतच नव्हते. त्यांचा ठोसा एवढा जोरात होता की, माझा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. माझा ओठ फाटला होता. शत्रुघ्न सिन्हा याविषयी पुढे बोलताना म्हणाले की, ‘अमिताभ यांना या घटनेमुळे खूपच दु:ख झाले होते.’ ‘शोले’ आणि ‘दीवार’ हे दोन्ही सुपरहिट चित्रपट अमिताभ अगोदर शत्रुघ्न सिन्हा यांना आॅफर करण्यात आले होते. मात्र या दोन्ही चित्रपटांना त्यांनी नकार दिला होता. शत्रुघ्न यास स्वत:ची चूक असल्याचे समजतात. त्याचबरोबर त्यांना आनंदही वाटतो की, ‘शोले’मध्ये अमिताभ यांना जयची भूमिका मिळाली. कारण या चित्रपटाने इतिहास रचला असून, अमिताभला नाव दिल्याचे शत्रुघ्न सांगतात.