Join us

Shocking : ‘२.०’चा टीजर आॅनलाइन लीक; रजनीकांत यांच्या मुलीने व्यक्त केला संताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2018 14:24 IST

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित ‘२.०’ या चित्रपटाचा टीजर आॅनलाइन लीक झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. ...

साउथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी आणि बहुप्रतिक्षित ‘२.०’ या चित्रपटाचा टीजर आॅनलाइन लीक झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामुळे रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत यांचा प्रचंड संताप झाला असून, त्यांनी याबाबतची स्पष्ट शब्दात निंदा केली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, ‘चित्रपटाचा टीजर अशाप्रकारे आॅनलाइन लीक करणे अजिबातच समर्थनार्थ नाही. केवळ काही सेकंदांच्या उत्साहासाठी निर्मात्यांना वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते. कष्ट आणि भावनांना बाजूला सारून अशाप्रकारचे कृत्य करणे एक हार्टलेस अ‍ॅक्ट आहे.’दरम्यान, गेल्या आठवड्यात रजनीकांत यांच्याच ‘काला’ या चित्रपटाबद्दलही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. कारण या चित्रपटाचा टीजर अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्याअगोदरच आॅनलाइन लीक करण्यात आला होता. ‘२.०’च्या टीजर लीकबद्दल असा अंदाज लावला जात आहे की, हा सर्व प्रकार विदेशातून केला गेला आहे. ज्याठिकाणी चित्रपटाच्या ग्राफिक्सचे काम केले जात होते.  एस. जयशंकर दिग्दर्शित ‘२.०’ हा चित्रपट मानव आणि जेनेटिक इंजिनियरिंग यांच्यातील युद्धावर आधारित आहे. या अगोदर याच मुद्द्यावर आधारित रजनीकांत यांचा ‘रोबोट’ हा चित्रपट आला होता. त्याचाच हा सीक्वल आहे. ‘रोबोट’ला प्रेक्षकांकडून प्रचंड पसंती मिळाली होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे ‘२.०’बद्दलही जबरदस्त अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. दरम्यान, लीक करण्यात आलेले टीजर एक रफकटप्रमाणे आहे. अशातही ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रजनीकांत यांचा ‘२.०’ दक्षिण भारताला आतापर्यंतचा सर्वांत मोठा बिग बजेट चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत यांना बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार टक्कर देताना दिसणार आहे. या चित्रपटाचे बजेट ४०० कोटींपेक्षा अधिक आहे. दरम्यान, या चित्रपटाचा टीजर आॅनलाइन लीक झाल्याने त्याची सर्व स्तरातून निंदा केली जात आहे. शिवाय दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही केली जात आहे. प्रसिद्ध ट्रेड एनालिस्ट रमेश बाळा यांनी याचा निषेध करताना एक ट्विट केले. ‘२.० चा टीजर आॅनलाइन लीक झाल्याने मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. निर्मात्यांनी याविरोधात कठोर कारवाई करायला हवी.’ आता दरम्यान, टीजर आॅनलाइन लीक झाल्याने निर्मात्यांकडून ते अधिकृतरीत्या प्रदर्शित केले जाणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.