Join us  

शमिता शेट्टीने या सिनेमासाठी आमिर खानचा सुपरहिट सिनेमा 'लगान'ला दिला होता नकार

By गीतांजली | Published: November 10, 2020 7:45 PM

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी हिने  'मोहब्बतें या' सुपरहिट चित्रपटाद्वारे धमाकेदार पदार्पण केले.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी हिने  'मोहब्बतें या' सुपरहिट चित्रपटाद्वारे धमाकेदार पदार्पण केले.  या मल्टीस्टारर चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या कलाकारांसोबत ती झळकली होती. 'मोहब्बतें'मध्ये शमिताबरोबर जिमी शेरगिल, प्रीती झांगियानी, उदय चोप्रा, किम शर्मा आणि जुगल हंसराज यांनी देखील डेब्यू केले होते. शमिताने धमाकेदार पदार्पण केले असले तरी फार कमी लोकांना माहिती आहे की  या चित्रपटासाठी आमिर खानच्या सुपरहिट सिनेमा लगानमध्ये काम करण्यास नकार दिला होता.

नुकताच शिल्पा शेट्टीने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हा खुलासा केला. याबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, हे दोन्ही चित्रपट खूप मोठे होते पण एकाच वेळी ऑफर करण्यात आले होते, त्यामुळे शमिताला या दोघांपैकी एक निवडावा लागला.  'लगान' चे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी शमिताला त्याच भूमिकेची ऑफर दिली जी नंतर ग्रेसी सिंगने साकारली.

शमिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी आता ती चित्रपटांमधून गायब झाली आहे.  2007 मध्ये आलेल्या 'कॅश' चित्रपटात शमिता दिसली होती.  शमिताने एकदा म्हटले होते की, तिला बऱ्याच  चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती, परंतु तिने एवढे चित्रपट नाकारले की तिला चित्रपटांची ऑफर येणे बंद झाले. मात्र, आता शमिता पुन्हा एकदा चित्रपटात परतण्याची तयारी करत आहे.

टॅग्स :आमिर खानशिल्पा शेट्टी