Join us  

या आजारामुळे शिल्पा शेट्टीचा बऱ्याचदा झाला गर्भपात, म्हणून घ्यावा लागला सरोगसीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 10:49 AM

वियाननंतर जेव्हा शिल्पा शेट्टी प्रेग्नेंट राहिली तेव्हा आजार अडसर ठरायचा आणि गर्भपात व्हायचा.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हल्लीच पुन्हा एकदा आई बनली आहे. 15 फेब्रुवारी 2020 ला तिने मुलीला जन्म दिला आहे. या मुलीच्या जन्मानंतर घरात सगळेच खूश आहेत. शिल्पा शेट्टीची मुलगी समीशाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे. मुलगा वियान झाल्यानंतर शिल्पा व राज दुसऱ्या मुलाचे प्लानिंग करत होते. पण एका आजारामुळे शिल्पा आई बनू शकत नव्हती. कंसीव करूनही सारखे सारखे मिसकॅरेज होत होते. शेवटी त्यांना सरोगसीचा पर्याय निवडावा लागला.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा म्हणाली की, वियानच्या जन्मानंतर बऱ्याच कालावधीनंतर दुसरे मुल हवे होते. पण, मला ऑटो इम्युन नावाचा आजार झाला होता. ज्याला APLA असेही म्हणतात. या आजारामुळे मी पुन्हा आई होण्याची इच्छा पूर्ण होऊ देत नव्हता. जेव्हा मी प्रेग्नेंट रहायचे तेव्हा हा आजार मध्ये येत होता आणि त्यामुळे गर्भपात व्हायचा.

ती पुढे म्हणाली की, वियान सिंगल चाइल्ड मोठा व्हावा, अशी माझी इच्छा नव्हती. कारण आम्ही दोघी बहिणी होतो. मला माहित आहे की दुसरा भाऊ किंवा बहिण असणे किती गरजेचे असते. त्यामुळे दुसऱ्या आयडियावर देखील भर दिला. मात्र ते यशस्वी ठरले नाही. एक वेळ मी मुल दत्तक घ्यायचा विचार केला. मला फक्त त्या बाळाला आमचे नाव द्यायचे होते.सगळं काही होत होते. पण, तेव्हा ख्रिश्चन मिशिनरी बंद झाली. मला चार वर्ष वाट पहावी लागली. त्यानंतर मी खूप त्रस्त झाली आणि मी सरोगसीचा पर्याय निवडला. तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर आम्हाला समीशा मिळाली. एक वेळ अशी आली होती तेव्हा दुसऱ्या मुलांचा विचार डोक्यातून काढावा लागेल.

एका मुलाखतीत शिल्पाने बॉडी शेमिंगबद्दलही सांगितले, वियानच्या जन्मानंतर माझ्या वजनाला घेऊन बॉडी शेमदेखील केले होते. प्रेग्नेंसी दरम्यान 32 किलो वजन वाढले होते आणि वियान झाल्यानंतर 2 ते 3 किलो वजन आणखीन वाढले होते. हे पाहून लोकांनी कमेंट करायला सुरूवात केली होती. 

शिल्पा शेट्टी व राज कुंद्रा यांनी 2009 साली लग्न केले होते. 21 मे, 2012 ला वियानचा जन्म झाला. यावर्षी त्यांच्या घरी समीशाचे आगमन झाले.

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा