Join us  

Video : "तू शिल्पा शेट्टीचा नवरा आहेस का?", राज कुंद्राच्या वादग्रस्त प्रकरणावरील 'UT 69' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 4:12 PM

तुरुंगातील ६३ दिवसांवर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा राज कुंद्राने काही दिवसांपूर्वी केली होती. आता राज कुंद्राच्या या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 

लिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला जुलै २०२१मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली होती. ६३ दिवस तुरुंगात घालवल्यानंतर राज कुंद्रा बाहेर आला होता. तुरुंगातील त्या ६३ दिवसांवर आधारित चित्रपट काढणार असल्याची घोषणा राज कुंद्राने काही दिवसांपूर्वी केली होती. आता राज कुंद्राच्या या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. 

राज कुंद्राच्या या चित्रपटाचं नाव 'UT 69' असं आहे. कुंद्राने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या चित्रपटाचा ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. राज कुंद्राचा तुरुंगातील ६३ दिवसांचा प्रवास या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधून राज कुंद्राच्या तुरुंगातील त्या ६३ दिवसांची झलक पाहायला मिळत आहे. एका सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती असलेल्या राज कुंद्राला तुरुंगात कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला, याची छोटी झलक ट्रेलरमधून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. 

पोर्नोग्राफी प्रकरणामुळे तुरुंगात गेलेल्या राज कुंद्राच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन शहनवाज अली यांनी केलं आहे. राज कुंद्राने स्वत:च त्याची भूमिका या चित्रपटात साकारली आहे. 'UT 69' या चित्रपटाच्या निमित्ताने राज कुंद्रा पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. ३ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी