Join us  

‘ सकाळी कळलं आणि मला...’; फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच शिल्पा शेट्टीचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 11:02 AM

पोर्नोग्राफी प्रकरणात पतीला अटक झाली तेव्हा Shilpa Shetty त्यावर काहीही बोलली नव्हती. पण या फसवणुकीच्या प्रकरणानंतर मात्र तिची प्रतिक्रिया समोर आली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)आणि तिचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) यांच्या अडचणी संपता संपत नाहीयेत. काही दिवसांपूर्वीच शिल्पाचा पती तुरुंगातून बाहेर आला आणि आता मुंबईतील एका प्रसिद्ध व्यावसायिकाने शिल्पा आणि राज यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोर्नोग्राफी प्रकरणात पतीला अटक झाली तेव्हा शिल्पा त्यावर काहीही बोलली नव्हती. पण या फसवणुकीच्या प्रकरणानंतर मात्र तिची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्वीट करत तिने यावरची प्रतिक्रिया मांडली आहे. (Shilpa Shetty reacts to cheating and fraud complaint)

 सकाळी कळलं आणि मला धक्का बसला...ट्वीटमध्ये शिल्पा लिहिते, ‘सकाळी उठले आणि माझ्या व राजविरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचं मला कळलं. मला धक्का बसला. मी सांगू इच्छिते की, .... एक व्हेंचर आहे, जे काशिफ खान चालवत होता.  या ब्रँडच्या नावाने देशभरात फिटनेस जिम उघडण्याचे सर्व अधिकार त्याने घेतले होते. याबाबतच्या सर्व करारावर तो स्वाक्षरी करायचा.  बँकिंग आणि इतर नियमित कामाची जबाबदारीही त्याच्यावर होती. त्यामुळे त्याच्या कोणत्याही व्यवहाराची आम्हाला माहिती नाही. ना त्याच्याबद्दल आम्हाला काही ठाऊक आहे, ना त्याच्याकडून आम्ही कोणतेही पैसे घेतले आहेत.  या सर्व फ्रँचायझीची डील थेट काशिफ खानमार्फत होते. ही कंपनी 2014 मध्ये बंद झाली असून त्याची संपूर्ण जबाबदारी ही काशिफ खानने घेतली होती.मी गेल्या 28 वर्षे अपार कष्ट करून इथपर्यंत पोहोचले आहे. मात्र इतक्या सहजपणे माझं नाव, माझी प्रतिष्ठा खराब होत असल्याचे पाहून मला फार दु:ख होत आहे. मी या देशाची कायद्याचे पालन करणारी आणि आदर करणारी  नागरिक आहे. त्यामुळे मला माझ्या अधिकारांचे संरक्षण केले पाहिजे.’  

नेमकं प्रकरण काय?

नितीन बराई नावाच्या व्यक्तीने शिल्पा आणि राज कुंद्राविरोधात 2014 पासून फसवणूक करत असल्याची तक्रार दिली आहे. बराई यांच्या तक्रारीवरून शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आयपीसी 406, 409, 420, 506, 34 आणि 120 (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. मुंबई पोलीस लवकरच या प्रकरणी आरोपींची चौकशी करू शकतात. तसेच या प्रकरणी राज  आणि शिल्पाशी पोलीस संपर्क साधण्याची शक्यता आहे.    शिल्पा आणि राज यांच्या कंपनीची फ्रँचायझी घेऊन पुण्याच्या कोरेगाव भागात स्पा आणि जिम उघडली तर खूप फायदा होईल, या आशेने बराई यांनी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, बराई यांच्या आरोपानुसार, या व्यवहारात त्यांची फसवणूक झाली. त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांना धमकी देखील देण्यात आली.  राज कुंद्रा याला गेलसर जुलैमध्ये पॉर्न फिल्म बनविल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. या आरोपाखाली राज कुंद्रा दोन महिने तुरुंगात होता. सध्या तो जामिनावर बाहेर आहे.  

 

टॅग्स :शिल्पा शेट्टीराज कुंद्रा