रक्षित शेट्टी आणि रश्मिका मंदाना यांचा आज साखरपुडा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2017 10:31 AM
रक्षित शेट्टी आणि रश्मिका मंदाना ही कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रीय जोडी आता नात्यात अडकणार आहे. होय, रक्षित आणि रश्मिका यांचा ...
रक्षित शेट्टी आणि रश्मिका मंदाना ही कन्नड चित्रपटसृष्टीतील लोकप्रीय जोडी आता नात्यात अडकणार आहे. होय, रक्षित आणि रश्मिका यांचा आज संध्याकाळी साखरपुडा होत आहे. एका ग्रॅण्ड सोहळ्यात रक्षित व रश्मिका एकमेकांच्या बोटात अंगठी घालतील. या सोहळ्यासाठी २५०० पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आल्याचे कळतेय. कन्नड चित्रपटसृष्टीत सर्व दिग्गजांना या सोहळ्याचे निमंत्रण आहे.‘किरिक पार्टी’ या चित्रपटाने रक्षित व रश्मिका यांना एक वेगळी ओळख दिली. गतवर्षी आलेला हा चित्रपट कन्नड भाषेतील ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. यातील रक्षित व रश्मिका यांची केमिस्ट्री लोकांनी चांगलीच पसंत केली. यानंतर दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा यायला लागल्या. आधी रक्षित व रश्मिका या दोघांनीही असे काहीही नसल्याचे आरेडून आरेडून सांगितले. पण कालांतराने सत्य काय ते बाहेर आलेच. ‘मी व रक्षित आम्ही चांगले मित्र होतो. पण मीडियात आमच्या रिलेशनशिपच्या बातम्या यायला लागल्या आणि या बातम्यांनी माझ्या कुटुंबाचा संयम तुटला. माझ्या डॅडने चक्क रक्षितला फोन करून बोलवून घेतले. रक्षित आलाही. तो डॅडला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार त्याआधीच तुम्ही दोघेही एकमेकांना पसंत करत असाल तर आमची हरकत नाही. मी रश्मिकाचा हात तुझ्या हातात द्यायला तयार आहे. असे माझे डॅड रक्षितला म्हणाले’, असे रश्मिकाने सांगितले आणि पुढे या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले. यानंतर रक्षितनेही एका मुलाखतीत आपले मौन तोडत, रश्मिकासोबतचे नाते कबुल केले. ३ जुलैला आम्ही साखरपुडा करणार असल्याचे त्याने जाहिर केले.एकंदर काय, तर मैत्री मैत्री करता करता रक्षित व रश्मिता दोघेही प्रेमाच्या बंधनात अडकलेत आणि आता सहजीवनाच्या पुढच्या प्रवासाला निघणार. आपण त्यांना शुभेच्छा देऊयात!