Join us  

शेखर सुमनने पहिल्याच चित्रपटात दिले होते रेखा यांच्यासोबत 'हे' इंटिमेट सीन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 4:19 PM

शेखर सुमनला पहिल्याच चित्रपटात रेखा यांच्यासोबत इंटिमेंट सीन द्यायचा असल्यामुळे त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती.

ठळक मुद्देरेखा यांच्या पहिल्या भेटीविषयी शेखर सुमन सांगतो, शशी कपूर यांच्या ऑफिसमध्ये मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. सावन भादो या चित्रपटाच्यावेळी मी केवळ सातवीत होतो. तेव्हापासून मी त्यांचा फॅन होतो.

शेखर सुमनने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला उत्सव या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात अभिनेत्री रेखा त्याच्या नायिकेच्या भूमिकेत होती. या चित्रपटात इंटिमेट सीनचा भडिमार होता असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. शेखर सुमनला पहिल्याच चित्रपटात रेखा यांच्यासोबत इंटिमेंट सीन द्यायचा असल्यामुळे त्याची अवस्था कशी झाली होती हे त्याने न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

शेखरने मुलाखतीत सांगितले होते की, मी मुंबईत आल्यानंतर मला शशी कपूर यांना भेटण्याची संधी मिळाली. मी नाटकात काम करत असून मला चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचे मी त्यांना पहिल्याच भेटीत सांगितले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, रेखा यांच्यासोबत उत्सव या चित्रपटावर सध्या ते काम करत असून या चित्रपटाच्या नायकाच्या ते शोधात आहेत. रेखा यांच्यासारखी प्रसिद्ध अभिनेत्री माझ्यासोबत काम का करेल असा प्रश्न मला त्यावेळी पडला होता तर त्यांनी मला सांगितले की, या चित्रपटातील नायक हा नायिकेपेक्षा छोटा असून या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरिश कर्नाड करणार आहेत, त्यांना जाऊन तू भेट...

शेखरने या मुलाखतीत पुढे सांगितले होते की, गिरिश कर्नाड त्यावेळी माहिमला राहायचे. मी त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी या चित्रपटाच्या भूमिकेसाठी मला स्क्रीन टेस्ट द्यायला सांगितली. मी टेस्ट द्यायला गेलो, त्यावेळी तिथे 500-1000 लोक होते. मी देखील इतक्या लोकांसोबत ऑडिशन दिले. ऑडिशन झाल्यानंतर शेखर सुमन सोडून सगळ्यांनी घरी जा... असे गिरीश यांनी माईकवरून सांगितले आणि अशाप्रकारे माझी या चित्रपटासाठी निवड झाली. 

रेखा यांच्या पहिल्या भेटीविषयी शेखर सुमन सांगतो, शशी कपूर यांच्या ऑफिसमध्ये मी पहिल्यांदा त्यांना भेटलो. सावन भादो या चित्रपटाच्यावेळी मी केवळ सातवीत होतो. तेव्हापासून मी त्यांचा फॅन होतो. त्यांच्यासोबत मला पहिलाच सीन हा इंटिमेंट सीन द्यायचा होता. पण नर्व्हस न होता मी पहिला सीन दिला. मी रंगभूमीवर काम करतानाचा आलेला सगळा अनुभव या चित्रपटासाठी वापरला. 

टॅग्स :शेखर सुमनरेखा