Join us

मृत्यूपूर्वी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या होत्या श्रीदेवी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 13:21 IST

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. भाचा मोहिम मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा ...

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री दुबईत निधन झाले. भाचा मोहिम मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या. हा लग्न सोहळा आनंदात पारही पडला.  पण याचदरम्यान शनिवारची रात्र श्रीदेवींच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी घेऊन आली. प्राप्त माहितीनुसार, शनिवारी रात्री श्रीदेवी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि पडताक्षणी  बेशुद्ध झाल्यात. त्यांना ताबडतोब रूग्णालयात हलवण्यात आले. रूग्णालयात पोहोचल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, हे स्पष्ट झाले. याच झटक्याने त्यांचे निधन झाले.श्रीदेवी, त्यांचे पती बोनी कपूर, मुलगी खुशी असे सगळेच मोहितच्या लग्नासाठी गेले होते. याशिवाय अख्खे कपूर घराणे या लग्नात सहभागी झाले होते. अभिनेते संजय कपूर हेही या सोहळ्याला हजर होते. शनिवारी रात्री १२ वाजता संजय दुबईहून मुंबईत पोहोचले. पण येथे पोहोचताच त्यांना श्रीदेवींच्या निधनाची बातमी कळली. त्यांनी लगेच दुबईची फ्लाईट पकडली आणि ते आल्या पावली माघारी परतले.संजय यांनी दुबईत खलीज टाईम्सशी बोलताना सांगितले की, श्रीदेवी यांना हार्ट अटॅक आलाय, ही बातमी ऐकून मी स्तब्ध झालो. त्यांना कधीच हृदयासंदर्भातील कुठलीही तक्रार नव्हती. दुबईत रात्री आठच्या सुमारास हॉटेलमध्ये असताना त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. दुपारी २ वाजेपर्यंत श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. तूर्तास श्रीदेवींच्याम मुंबईतील निवासस्थानी चाहते, मीडिया, नातेवाईक अशा सर्वांची गर्दी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आल्यावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.ALSO READ : ‘हा’ अखेरचा व्हिडिओ...! फ्लार्इंग किस देत श्रीदेवींनी घेतला अखेरचा निरोप! श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूड आणि सोशल मीडियात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेते अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, जॉनी लिव्हर, प्रियांका चोप्रा, प्रिती झिंटा, नेहा धुपिया अशा अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनी श्रीदेवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.