शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:37 IST
शशी कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यांना कलयुग, जूनुन यांसारख्या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार ...
शशी कपूर यांचे गाजलेले चित्रपट
शशी कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकाहून एक दर्जेदार भूमिका साकारल्या. त्यांना कलयुग, जूनुन यांसारख्या चित्रपटांसाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता तर दीवार या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. या चित्रपटातील मेरे पास माँ हे हा त्यांचा संवाद प्रचंड गाजला होता. त्यांना पद्मभुषण, दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारखे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले होते. न्यू देल्ही टाइम्स या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता तर जुनुन या त्यांच्या चित्रपटाला देखील राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जुनुन या चित्रपटाचे शशी कपूर निर्माते होते. शशी कपूर यांचे अनेक चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. नमक हलालजब जब फूल खिलेशर्मिलीदीवारप्यार का मौसम सुहाना सफरवक्तत्रिशुलसत्यम शिवम सुंदरमसुहागकभी कभीआ गले लग जाचोरी मेरा कामहसिना मान जायेगीबसेराजुनून फकिराशानकलयुग