Join us

शशी कपूर यांचे प्रसिद्ध चित्रपट जे पाहून लोकं थकत नसायचे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 19:15 IST

सदाबहार अभिनेता शशी कपूर यांचे नुकतेच निधन झाले. गेल्या तीन आठवड्यापासून शशी कपूर आजारी होते. त्यांनी ७९ व्या वर्षी ...

सदाबहार अभिनेता शशी कपूर यांचे नुकतेच निधन झाले. गेल्या तीन आठवड्यापासून शशी कपूर आजारी होते. त्यांनी ७९ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. शशी कपूर यांच्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांना बऱ्याच अ‍ॅवार्डने सन्मानित करण्यात आले होते. २०११ मध्ये भारत सरकारने पद्म भूषण देऊनही गौरव केला होता. विशेष म्हणजे २०१५ मध्ये कपूर परिवारात दादासाहेब फाळके पुरस्कार घेणारे तिसरे व्यक्ती होते.  शशी कपूर यांनी आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांचे मने जिंकली होती. त्यांचे ६० ते ७० व्या दशकातील दीवार (1975), सत्यम शिवम सुंदरम (1978), जुनून (1978), शान (1980), नमक हलाल (1982) सोबतच जब-जब फूल खिले, कन्यादान, शर्मीली, आ गले लग जा, रोटी कपड़ा और मकान, चोर मचाए शोर, कभी-कभी आणि फकीरा आदी चित्रपट तर सर्वांसाठी अविस्मरणीय आहेत. दिवार चित्रपटात अमिताभ बच्चनने विचारलेले होते की, ‘मेरे पास बॅँक है, प्रॉपर्टी बैंलेंस है तुम्हारे पास क्या है? यावरुन शशी कपूरचा, ‘मेरे पास मां है।’ हा डायलॉग तर लोक आजपर्यंत विसरु शकले नाहीत.