Join us  

फॅमिली मॅनमधील अरविंद म्हणतोय, लोणावळ्यात काय झाले चेल्लम सरांना विचारा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 5:26 PM

फॅमिली मॅन 1 मध्ये अरविंद आणि सुची यांच्यात लोणावळ्याला काय झाले हा प्रश्न या बेवसिरिजच्या चाहत्यांना पडला आहे. यावरूनच हे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

ठळक मुद्देया वेबसरिजमध्ये अरविंदची भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरने हे मीम शेअर केले आहे. अरविंद आणि सूची सोबत असताना चेलम मागे उभा असल्याचे यात आपल्याला दिसत आहे.

फॅमिली मॅन 2 या वेबसिरिजची सध्या सगळीकडेच चर्चा रंगली आहे. मनोज वाजपेयीची मुख्य भूमिका असलेल्या या वेबसिरिजची कथा, कलाकारांचा अभिनय सगळे काही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या वेबसिरिजमधील एक कलाकार सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यावर विविध मीम्स देखील बनवले जात आहेत.

यामधील एक मीम सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. फॅमिली मॅन 2 मध्ये श्रीकांतला कोणत्याही गोष्टीविषयी माहिती हवी असल्यास तो चेल्लमला विचारतो आणि चेल्लमला सगळ्याच गोष्टी माहीत असल्याने तो लगेचच त्या गोष्टींविषयी सांगतो. फॅमिली मॅन 1 मध्ये अरविंद आणि सुची यांच्यात लोणावळ्याला काय झाले हा प्रश्न या बेवसिरिजच्या चाहत्यांना पडला आहे. यावरूनच हे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

या वेबसरिजमध्ये अरविंदची भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरने हे मीम शेअर केले आहे. अरविंद आणि सूची सोबत असताना चेलम मागे उभा असल्याचे यात आपल्याला दिसत आहे. यासोबत लिहिण्यात आले आहे की, चेल्लम सर तुम्ही पाहिले होते तर हे पण श्रीकांतला तुम्ही सांगायला पाहिजे होते.

या वेबसिरिजमध्ये चेल्लमची भूमिका उदय महेश यांनी साकारली असून ते तामीळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

टॅग्स :शरद केळकरमनोज वाजपेयीवेबसीरिज