Join us  

उगाच फालतूमध्ये महान बनण्याचा प्रयत्न का करतोयस? नवाजुद्दीनला लहान भावानेच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 2:42 PM

नवाजुद्दीन सिद्दीकी अलीकडे मालदीवमधील व्हॅकेशनचे फोटो शेअर करणा-या सेलिब्रिटींवर भडकला होता. पण नवाजचं हे वागणं कदाचित त्याच्या लहान भावाला फारसं आवडलं नाही...

ठळक मुद्देबॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नवाज सेलिब्रिटींवर बरसला होता. 

बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने  (Nawazuddin Siddiqui)  अलीकडे बॉलिवूड सेलिब्रिटींचा चांगलाच क्लास घेतला होता. कोरोनाकाळात मालदीवमधील सुट्टीचे फोटो शेअर करणा-या  सेलिब्रिटींवर नवाज भडकला होता. लोकांना पोट भरण्यासाठी अन्न नाही आणि तुम्ही पैसे उधळत आहात, अरे जरा तरी लाज बाळगा, असे तो म्हणाला होता. पण कदाचित नवाजचा हा संताप त्याचा लहान भाऊ शमास नवाब सिद्दीकीला (Shamas Nawab Siddiqui) आवडला नाही. त्याने काय केले तर सोशल मीडियावर पोस्ट करत नवाजलाच सुनावले. (Shamas Nawab Siddiqui slams Nawazuddin Siddiqui )

काय म्हणालाशमास?

शमास नवाब सिद्दीकी हा नवाजुद्दीनचा लहान भाऊ आहे.  शमासने नवाज सेलिब्रिटींवर भडकल्याची बातमी रिट्विट करत एक ट्विट केले. ‘तुला इतका राग का येतोय भावा? प्रत्येकाला वाटेल तिथे जाण्याचा फिरण्याचा अधिकार आहे. प्रत्येकजण टॅक्स देतोय आणि देशाला मदत करतोय. तू मला सांगू शकतोस की, तू देशासाठी काय केलेय?  प्लीज, उगाच फालतूमध्ये चांगला बनण्याचे प्रयत्न का करतोस?’ असे ट्विट शमासने केले.

काय म्हणाला होता नवाज?बॉलिवूड हंगामा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नवाज सेलिब्रिटींवर बरसला होता. ‘देशातली स्थिती फार खडतर आहे. कोव्हिडच्या केसेस वाढतायत. लोकांना खायला अन्न मिळत नाहीय. देशाची स्थिती अशी असताना, काही कलाकार मालदिवला जाऊन तिथले फोटो पोस्ट करतायत. लोकांकडे खायला पैसे नाहीयत आणि तुम्ही पैसे उडवताय. अरे जरा तरी लाज बाळगा. ' हे सगळे कलाकार आपल्या सुट्टीचे फोटो पोस्ट करतायत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. अभिनयावरही ते बोलत नाहीत. कारण यावर बोलले तर ते या सिस्टीममधून बाहेर पडतील. मालदिवचा तमाशा करून ठेवला आहे सगळ्यांनी. तिथे त्यांची पर्यटनादृष्टीने काय सोय आहे मला माहीत नाही. पण तुमची सुट्टी तुमच्यापुरती ठेवा. इकडे कोव्हिड पेशंट वाढतायत. थोडीतरी सहानुभूती दाखवा,’असे तो म्हणाला होतासध्या मी माझ्या बुधाना या गावी आहे. हेच माझे मालदिव आहे, असेही तो म्हणाला होता.

टॅग्स :नवाझुद्दीन सिद्दीकी