शाहरुखची कला अन् व्यवसाय; लग्न झालेल्या महिलांसोबत रोमांस
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 21:42 IST
मी लग्न झालेल्या आणि रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलांसोबत प्रेम करण्याची कला आत्मसाद केली आहे आणि हाच माझा व्यवसाय आहे, असे ...
शाहरुखची कला अन् व्यवसाय; लग्न झालेल्या महिलांसोबत रोमांस
मी लग्न झालेल्या आणि रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलांसोबत प्रेम करण्याची कला आत्मसाद केली आहे आणि हाच माझा व्यवसाय आहे, असे शाहरुख खानने एका मुलाखती दरम्यान सांगितलेय. हे तो आपल्या रिअल नव्हे रिल लाईफबद्दल बोलत होता. शाहरुखने नुकताच आपला 51 वा वाढदिवस साजरा केला. याच वर्षी त्याच्या लग्नाला 25 वर्षे झाली आहेत. बॉलिवूडच्या हॉट कपलमध्ये शाहरुख व गौरीचा उल्लेख के ला जातो. त्याचे आगामी चित्रपट ‘रईस’ व ‘डीअर जिंदगी’मुळेही तो बॉलिवूडमध्ये चांगलाच चर्चेत आहे. याच दरम्यान त्याने एका मुलाखती दिली असून यामध्ये त्याने आपल्या रिल लाईफबाबत दिलखुलास उत्तरे दिली. ‘बॉलिवूडमध्ये बदलणारे प्रेमाचे स्वरूप’ या प्रश्नावर शाहरुख म्हणाला, मी गेल्या काही वर्षांत लग्न झालेल्या व रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिलांसोबत प्रेम करण्याची कला शिकलो आहे, हाच माझा व्यवसाय आहे, मी त्याच्या मागे फिरतो, ती कुठेही असली तरी मी तिला मिळवितोच. कधी माझ्या चार्ममुळे तर कधी माझ्या चांगुलपणामुळे हे घडते. एखाद्या वेळी मी माझ्या प्रियसींना बिल्डिंगवरून फेकून देतो. माझ्यात काही समस्या आहेत, हे मला ठाऊक आहे. याचे एकच उत्तर आहे ते मला ठाऊक आहे. तरी देखील मी हेच वारंवार करतो आहे, असे शाहरुख म्हणाला. त्याने आपल्या या उत्तराने त्याला जे सांगायचे होते ते त्याने कोड्यात सांगितले आहे. मागील 25 वर्षांत शाहरुख खानने अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र मागील काही चित्रपटातून तो लग्न झाल्यानंतरच्या अफेअर्समध्ये असलेल्या भूमिका साकारताना दिसला. बॉलिवूडमध्ये नवे स्टार्स आले असले तरी कॉलेज लाईफ किंवा लव्ह स्टोरीज आता दिसत नाहीत. बॉलिवूडमधील दिग्गज चित्रपट निर्माते देखील विवाहेतर संबधावर चित्रपटांची निर्मिती करीत असल्याचे त्याला सुचवायचे असेल.