शाहरूख खानच्या ‘झिरो’ लूकची नेटक-यांनी घेतली मजा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:22 IST
किंगखान शाहरूख खान याच्या ‘झिरो’ या नव्या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. या चित्रपटाचा टीजरही तुम्ही पाहिलातं.‘झिरो’मध्ये शाहरूख बुटक्या व्यक्तिच्या ...
शाहरूख खानच्या ‘झिरो’ लूकची नेटक-यांनी घेतली मजा!!
किंगखान शाहरूख खान याच्या ‘झिरो’ या नव्या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले. या चित्रपटाचा टीजरही तुम्ही पाहिलातं.‘झिरो’मध्ये शाहरूख बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत दिसणार आहे. यातील शाहरूखचा ‘झिरो’ अवतार चाहत्यांना प्रचंड भावलायं. पण काही टर उडवणारेही आहेत. होय, काही लोकांनी ‘झिरो’वरून शाहरूखला ट्रोल करणे सुरु केले आहे. ‘झिरो’साठी शाहरूखने किती मेहनत घेतली, याचा अंदाज नाही. पण याकडे दुर्लक्ष करत अनेक नेटक-यांनी शाहरूखच्या त्रूटींवर बोट ठेवले आहे. ‘झिरो’मधील शाहरूखचा लूक पाहून अनेकांनी त्यांची टींगल करणाºया कमेंट्स केल्या आहेत. ‘कैसे बुरे दिन आ गए है शाहरूख सर के...’ असे एका युजरने लिहिलेयं. दुसºयाने त्याची तुलना राजपाल यादवसोबत केली आहे. या कमेंट्स बघता, शाहरूखचा हा नवा अवतार लोकांना भावला नाही, असेच दिसतेय. पण हा नुसता ‘ट्रेलर’ आहे, ‘पिक्चर तो अभी बाकी है,’ हे लोकांना कोण सांगणार? ALSO READ : शाहरूख खान बनणारं ‘ZERO’! नव्या चित्रपटाचा टीजर रिलीज!!शाहरूखसाठी गतवर्र्ष कमालीचे अनलकी ठरले. गतवर्षातील त्याचा अखेरचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ही बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे या वर्षात शाहरूखला मोठ्या हिटची गरज आहे. साहजिकच ‘झिरो’कडून त्याला प्रचंड अपेक्षा आहेत. आत या अपेक्षांवर बघता ‘झिरो’वरच्या या टिंगल करणाºया कमेंट्सला शाहरूख कसे उत्तर देतो ते बघूच.आनंद एल राय यांच्या या चित्रपटात शाहरूख खानसोबत अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ या दोघी मुख्य भूमिकेत आहेत. अर्थात टीजरमध्ये या दोघीही नाहीत. या चित्रपटातील शाहरूखची व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुसºया लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल.