Join us  

शाहरुख खानची माया मेमसाब आता दिसते अशी, या चित्रपटातील न्यूड सीनमुळे आली होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 2:40 PM

शाहरुख खान आणि या चित्रपटाची नायिका माया मेमसाब म्हणजेच दीपा साही यांनी या चित्रपटात न्यूड सीन दिला होता. 

ठळक मुद्देदीपा साही यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक केतन मेहता यांच्यासोबत झाले आहे. माया मेमसाब या दीपाच्या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते.

शाहरुख खानने त्याच्या कारकिर्दीतील सुरुवातीला माया मेमसाब या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट त्याकाळी चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेपेक्षा हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला होता. या चित्रपटातील एक न्यूड सीनची त्याकाळी प्रचंड चर्चा झाली होती. शाहरुख खान आणि या चित्रपटाची नायिका माया मेमसाब म्हणजेच दीपा साही यांनी या चित्रपटात न्यूड सीन दिला होता. 

दीपा साही यांच्या माया मेमसाब या चित्रपटातील अभिनयाचे देखील चांगलेच कौतुक झाले होते. त्यांना या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दीपा साही यांचा जन्म देहरादूनमध्ये झाला असून त्या मोठ्या झाल्यानंतर त्यांचे कुटुंब कॅनडात राहायला गेले. पण दीपा यांनी भारतात राहाणेच पसंत केले आणि येथेच त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले. दीपा या उच्चशिक्षित असून त्यांना सोशोलॉजी या विषयात गोल्ड मेडल मिळाले आहे. त्यांना कधीच अभिनेत्री नव्हे तर दिग्दर्शक बनायचे होते. पण त्या अतिशय सुंदर दिसत असल्याने एसएसडीमध्ये असताना त्यांना अभिनयाच्या ऑफर यायला लागल्या. त्यामुळे त्यांनी पार्टी या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आघात, हम, दुश्मन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी प्रेक्षकांना आजही त्यांचा माया मेमसाब हाच चित्रपट चांगला लक्षात आहे. ओह डार्लिंग ये है इंडिया या चित्रपटात देखील त्यांनी काम केले होते. पण त्याचसोबत या चित्रपटाची कथा देखील त्यांनीच लिहिली होती. 

दीपा साही यांचे लग्न प्रसिद्ध दिग्दर्शक केतन मेहता यांच्यासोबत झाले आहे. हे त्यांच्या दोघांचेही दुसरे लग्न आहे. माया मेमसाब या दीपाच्या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी मांजी या चित्रपटात काम केले होते. तसेच तेरे मेरे फेरे या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच मंगल पांडे या आमिर खानच्या प्रसिद्ध चित्रपटाच्या त्या निर्मात्या होत्या.  

टॅग्स :शाहरुख खान