Join us  

शाहरुख खानच्या अबराम आणि आर्यनने केले आहे बॉलिवूडमध्ये पदार्पण, या चित्रपटांमध्ये केले आहे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 1:02 PM

अबराम आणि आर्यन दोघांनीही त्यांचा बॉलिवूड डेब्यू केला आहे.

ठळक मुद्देकभी खुशी कभी गम हा शाहरुख खानचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात छोट्या शाहरुखच्या भूमिकेत आर्यन खानला पाहायला मिळाले होते.

शाहरुख खानच्या अबराम आणि आर्यन या दोन्ही मुलांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे असे कोणी सांगितले तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का पण हे खरे आहे. अबराम आणि आर्यन दोघांनीही त्यांचा बॉलिवूड डेब्यू केला आहे.

कभी खुशी कभी गम हा शाहरुख खानचा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटात छोट्या शाहरुखच्या भूमिकेत आर्यन खानला पाहायला मिळाले होते. आर्यन आणि जया बच्चन यांच्यावर या चित्रपटात काही दृश्य चित्रीत करण्यात आलेले आहेत तर शाहरुखचा सर्वात छोटा मुलगा अबराम हॅपी न्यू ईयर या चित्रपटात झळकला आहे. सिनेमाच्या शेवटी क्रेडीटमध्ये अबराम दिसून आला होता. फक्त अबरामच नाही तर शाहरुखची पत्नी गौरीदेखील या चित्रपटात दिसली होती. ‘सारे मेनू क्यू शराबी कहते है’ या गाण्याच्या शेवटी शाहरूख अबरामसोबत नाचताना दिसतोय.

शाहरुखची मुलगी सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण त्याचआधी आर्यन आणि अबराम मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानआर्यन खानअबराम खानसुहाना खान