Join us

​शाहरूख-गौरी कसा साजरा करणार लग्नाचा २५ वा वाढदिवस?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2016 11:13 IST

शाहरूख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील सगळ्यांत सुंदर कपल म्हणून ओळखले जाते. प्रेम करणा-यांसाठी आदर्श ठरावे असे हे ...

शाहरूख खान आणि गौरी खान हे बॉलिवूडमधील सगळ्यांत सुंदर कपल म्हणून ओळखले जाते. प्रेम करणा-यांसाठी आदर्श ठरावे असे हे जोडपे उद्या २५ आॅक्टोबरला त्यांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करणार आहे. निश्चितपणे यावेळी शाहरूखने गौरीला एक आगळे-वेगळे सरप्राईज देण्याचा प्लॅन आखला आहे. सध्या शाहरूख इम्तियाज अलीच्या ‘दी रिंग’ या चित्रपटात बिझी आहे. मात्र या शूटींगमधून ब्रेक घेऊन एसआरके खास गौरीला सरप्राईज देण्यासाठी भारतात येणार आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचा २५ वा वाढदिवस अविस्मरणीयरित्या साजरा करण्याचे शाहरूखने ठरवले आहे. आपल्या काही जवळच्या मित्रांसाठी या निमित्ताने पार्टी आयोजित करण्याची त्याची योजना आहे.शाहरूख आणि गौरी दरवर्षी ग्रँड दिवाळी पार्टी देतात. या पार्टीत बॉलिवूडमधील मोठं-मोठे दिग्गज सामील होतात. यावेळी बॉलिवूडमधील लोक शाहरूख-गौरीच्या पार्टीसाठी उत्सूक आहेत. कारण यावेळी दिवाळीसोबत दोघांच्याही लग्नाचा २५ वा वाढदिवस आहे. या पार्टीत गौरीला एक खास सरप्राईज मिळणार आहे. पण हे खास सरप्राईज काय, हे तूर्तास तरी शाहरूख व्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नाही. अलीकडे शाहरूख एका मुलाखतीत त्याच्या व गौरीचा परस्परांवर असलेल्या विश्वासावर बोलला होता. मी २० वर्षांपासून बॉलिवूडमध्ये आहे. मी जगातील अनेक सौंदर्यवतींसोबत काम केले आहे. गेल्या २० वर्षांत माझ्या व अनेक अभिनेत्रींच्या लिंकअपच्या बातम्या मीडियात आल्या. पण या बातम्यांनी गौरीला कधीही विचलित केले नाही. या चर्चांना आमच्या नात्यावर काहीही परिणाम झाला नाही. कारण तिला ठाऊक आहे की, माझ्याकडे अशा गोष्टींसाठी अजिबात वेळ नाही, असे शाहरूख या मुलाखतीत म्हणाला होता. शाहरूख व गौरीचे नाते किती पक्के आहे, हे यावरून तुम्हाला कळून चुकले असेलच!