Join us

​टीव्हीवरही फ्लॉप झाली शाहिदची ‘ही’ अभिनेत्री! नाही मिळालेत मालिकेचे २२ लाख!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2018 12:33 IST

‘इश्क विश्क’,‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आपल्या पहिल्या टीव्ही मालिकेमुळे वादात सापडली आहे. बॉलिवूडमध्ये अपयशी झाल्यानंतर अमृताने छोट्या पडद्यावर ...

‘इश्क विश्क’,‘विवाह’ फेम अभिनेत्री अमृता राव आपल्या पहिल्या टीव्ही मालिकेमुळे वादात सापडली आहे. बॉलिवूडमध्ये अपयशी झाल्यानंतर अमृताने छोट्या पडद्यावर नशीब आजमावत, ‘मेरी आवाज ही पहचान है’ ही टीव्ही मालिका साईन केली होती. या मालिकेत अमृता लीड रोलमध्ये होती.   मालिका सुरु झाली आणि  टीआरपीअभावी लवकरच गुंडाळली गेली. पण तूर्तास या मालिकेसाठी देऊ केलेली फी अमृताला मिळालेली नाही. अमृताने यासंदर्भात टीव्ही असोसिएशन CINTAA कडे तक्रार केली आहे.प्रॉडक्शन हाऊन ‘द हाऊस आॅफ ओरिजनल्स’ने अद्याप आपले २२ लाख रूपये दिलेले नाहीत, असे या तक्रारीत अमृताने म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताने अनेक दिवस निश्चित वेळेपेक्षा अधिक तास काम केले. त्यामुळे ५ लाख रूपये वाढलेत. याशिवाय अमृतासोबत १७ लाख रूपयांचा मिनिमम गारंटी करार झाला होता. लीड आणि सीनीअर अ‍ॅक्टर्ससोबत  मिनिअम गारंटी साईन केला जातो. ब्लॉक केलेल्या डेट्सला प्रॉडक्शन हाऊस शूट करू न शकल्यास ही रक्कम दिली जाते. अशाप्रकारे प्रॉडक्शन हाऊसला अमृताला एकूण २२ लाख रूपये द्यायचे आहेत. यासंदर्भात अमृताने CINTAA कडे दाद मागितली आहे. चर्चा खरी मानाल तर प्रॉडक्शन हाऊस ५ लाख रूपये देण्यास राजी आहे. मात्र मिनिमम गारंटीच्या रकमेवर वाद सुरू आहे. सूत्रांच्या मते, ‘मेरी आवाज ही पहचान है’साठी अमृताने ज्या तारखा दिल्या होत्या. त्या तारखांना अनेकदा शूट होऊ शकले नव्हते.ALSO READ : अमृता रावने या अभिनेत्यासोबत किस सीन द्यायला दिला होता नकार!अमृताने २००२ मध्ये ‘अब के बरस’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यांनतर ती ‘द लीजेंड आॅफ भगत सिंह’मध्ये दिसली होती. पण  शाहिद कपूरसोबतच्या ‘इश्क विश्क’ आणि ‘विवाह’ या चित्रपटाने अमृताला खरी ओळख दिली.२०१६ मध्ये अमृताने आरजे अनमोलशी गुपचूप लग्न केले होते. टिष्ट्वटरवर तिने लग्नाची बातमी जाहिर केली होती. लग्नापूर्वी अमृता व अनमोल ७ वर्षे डेटींग करत होते. अर्थात अमृताने हे सगळे दडवून ठेवले. अमृता व अनमोलची भेट एका मुलाखतीदरम्यान झाली होती. या मुलाखतीनंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आलेत. लग्नाच्या दोन वर्षांपूर्वी अनमोलला डेंग्यू झाला होता. याचदरम्यान दोघांची मैत्री प्रेमात बदलली.