शाहीद मीराविषयी म्हणाला,‘बीस साल की हैं बेशरम’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 09:50 IST
शाहीदने लग्न करायचे ठरवले आणि सर्व युवतींची हृदये एका क्षणात तुटली. नॉन फिल्मी कुटुंबातील मिरा राजपूत त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी ...
शाहीद मीराविषयी म्हणाला,‘बीस साल की हैं बेशरम’
शाहीदने लग्न करायचे ठरवले आणि सर्व युवतींची हृदये एका क्षणात तुटली. नॉन फिल्मी कुटुंबातील मिरा राजपूत त्याच्यापेक्षा १४ वर्षांनी लहान असून देखील तिच्यासोबत त्याने पाहताक्षणीच लग्न करायचे ठरवले. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले असून ते दोघे एका बाळाचे पालक होण्यासही तयार आहेत.एका मुलाखतीत त्यांचे लग्न, मिरासोबतची लव्हस्टोरी आणि पालकत्व याविषयी बोलताना तो म्हणाला,‘मी आजही तिच्या तेवढ्याच प्रेमात पडतो. दररोज नव्याने. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही जवळपास सात तास एकमेकांशी बोलत होतो. दिल्लीतील माझ्या मित्राच्या फार्महाऊसवर आम्ही भेटलो होतो. आम्ही वॉक करण्यासाठी बाहेर गेलो.त्यानंतर सूर्य तिच्यामागे मावळत होता. तिच्या डोळयांकडे मी पाहिले असता मला कळाले की, तिचे डोळे डार्क नाहीत. त्याला एक वेगळीच चमक आहे. त्यावेळी मला वाटले की, ‘मैं इस लडकी से शादी कर सकता हूँ.’ त्यानंतर मी स्वत:शीच बोललो,‘तू काय विचार करतोयस? बीस साल की ही हैं बेशरम!’