Join us  

अंबानींच्या पार्टीत पांड्या ब्रदर्सने केला शाहिद कपूरचा 'फोटोबॉम्ब', Video पाहून येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 1:17 PM

क्रिकेटर्स पांड्या ब्रदर्सने अभिनेता शाहिद कपूरचा 'फोटोबॉम्ब' केल्याचे पाहायला मिळतेय. 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरीही लाडक्या बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. अंबानींच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी केवळ बॉलिवूड सेलिब्रिटीच नाही तर अनेक बडे राजकारणी आणि क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यापैकी एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. यात क्रिकेटर हार्दिक पांड्या ब्रदर्सने अभिनेता शाहिद कपूरचा 'फोटोबॉम्ब' केल्याचे पाहायला मिळतेय. 

 व्हिडीओमध्ये शाहिद पापाराझीसाठी पोज देताना दिसतोय. यातच पांड्या ब्रदर्स हार्दिक, कृणाल पंड्या आणि इशान किशन हे देखील मागून पोझ देतात. यातच शाहीद मागे वळून पाहतो आणि सगळेच हसायला लागतात. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.

 एका चाहत्याने लिहिले की, 'शाहिद किती डीसेंट आहे'. तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'शाहिद कपूर हा भविष्यातील अनिल कपूर आहे जो आजोबा झाल्यावरही एवढाच देखणा दिसेल. तर काही नेटकऱ्यांनी मात्र पांड्या ब्रदर्सवर नाराजी व्यक्त केली. एका यूजरने कमेंट केली की, 'हे लोक स्वतःमध्येच एवढे मग्न आहेत, शाहिद आधीचाच  तिथे उभा आहे हे त्यांच्या लक्षातही आलं नाही'.

अंबानींच्या गणेशोत्सवात अनेक दिग्गज कलाकार देखील उपस्थित राहिले. या सेलिब्रेशनमध्ये  शाहरुख खान कुटुंबासह पोहोचला. तर सलमान खान, रेखा, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग, सिद्धार्थ-कियारा, रितेश-जेनेलिया, श्रद्धा कपूर आणि जवान दिग्दर्शक अॅटली यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही दिसले. सचिन तेंडुलकर आणि केएल राहुल देखील उपस्थित होते. यावेळी नीता अंबानी आणि त्यांची मुले आकाश आणि अनंत अंबानी पाहुण्यांचे स्वागत करताना दिसले.

टॅग्स :शाहिद कपूरहार्दिक पांड्यामुकेश अंबानीक्रुणाल पांड्या