शाहिद कपूरच्या भावाचा हा भन्नाट डान्स बघून तुम्ही थक्क व्हाल, पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2018 18:53 IST
शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर याने एका इव्हेंटमध्ये असा काही डान्स केला की तो बघून उपस्थित दंग झाले. ईशानने केलेल्या डान्स स्टेप्स बघण्यासारख्या होत्या.
शाहिद कपूरच्या भावाचा हा भन्नाट डान्स बघून तुम्ही थक्क व्हाल, पाहा व्हिडीओ!
अभिनेता शाहिद कपूरला त्याच्या अभिनयाबरोबरच डान्ससाठीही ओळखले जाते. शाहिदचे डान्स गुरू शियामक डावर हे त्याला त्याच्या डान्स स्टेपमुळे पसंत करतात. आता शाहिद कपूरचा सावत्र भाऊ ईशान खट्टर आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवताना दिसत आहे. ईशान सध्या जान्हवी कपूरसोबत ‘धडक’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तसेच इरानी निर्माता माजिद मजिदीसोबत तो त्याच्या ‘बियॉन्ड द क्लाऊड्स’च्या प्रमोशनमध्येही व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आयोजित केलेल्या एका इव्हेंटमध्ये ईशानने अशा काही डान्स स्टेप्स केल्या जे बघून उपस्थित दंग झाले. काही दिवसांपूर्वीच ईशानने चित्रपटाची अभिनेत्री मालविका मोहनन आणि निर्माता माजिद मजिदी यांच्यासोबत ‘बियॉन्ड द क्लाउड्स’मधील छोटे मोटर चला... हे गाणे लॉन्च केले. यावेळी आयोजित केलेल्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये ईशानने त्याच्या डान्सच्या जबरदस्त मुव्ज दाखविल्या. ईशान ज्यापद्धतीने डान्स करीत होता, ते बघून उपस्थितांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, ‘बियॉन्ड द क्लाउड्स’च्या ट्रेलरवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हा चित्रपट पूर्णपणे मुंबईच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. भाऊ आणि बहिणीची मनाला भिडणारी कथा चित्रपटात दाखविण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांना पूर्ण विश्वास आहे की, चित्रपटातील स्टार ईशान खट्टर आणि मालविका मोहनन यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनाला भिडणार. हेच चित्रपटाच्या यशाचे गमक असल्याचे निर्मात्यांना वाटत आहे. झी स्टुडिओज् आणि नमह पिक्चर्सद्वारा निर्मित हा चित्रपट जगभरात २० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. ईशान खट्टर नीलिमा अजीम आणि राजेश खट्टर यांचा मुलगा आहे. तर शाहिद कपूर नीलिमा अजीमचा पहिला पती पंकज कपूरचा मुलगा आहे. ईशान खट्टरने बालकलाकार म्हणून ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. सध्या ईशानचे वय २२ वर्ष आहे.