Join us

​शाहीद कपूर अन् मीरा राजपूत ठरले ‘मोस्ट स्टाईलिश कपल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2017 15:16 IST

अभिनेता शाहिद कपूरची मोस्ट ब्युटिफुल बेटरहाफ मीरा राजपूत यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. होय, शाहीद आणि ...

अभिनेता शाहिद कपूरची मोस्ट ब्युटिफुल बेटरहाफ मीरा राजपूत यांनी पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. होय, शाहीद आणि मीरा दोघेही, मोस्ट स्टाईलिश कपल ठरले आहेत. अलीकडे हॉल आॅफ फेम अवॉर्ड्स सोहळ्यात शाहीद व मीरा या दोघांना स्टाईलिश कपल या अवार्डने गौरविण्यात आले.खरे तर लग्नाआधी मीराचा बॉलिवूडशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. पण शाहीदशी लग्न झाले आणि मीराने तितक्याच आत्मविश्वासाने बॉलिवूडला जवळ केले. अनेक इव्हेंटमध्ये, अनेक अवार्ड्स शोच्या रेडकार्पेटवर ती शाहीदसोबत आत्मविश्वासाने कॅमेºयांना सामोरी गेली. एका गोंडस मुलीला जन्म दिल्यानंतर मीरा सध्या तिच्या पालनपोषणात बिझी आहे. पण सोबतच शाहीदला त्याच्या करिअरमध्ये पूर्ण पाठींबा देण्याची जबाबदारीही ती योग्यप्रकारे सांभाळते आहे.ALSO READ : शाहिद कपूरने केला पत्नी मीरा राजपूतचा बचाव; वाचा, नेमकं काय आहे प्रकरण? मीराने अलीकडे कामकाजी महिलांबद्दल एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून तिला बºयाच टीकेचा सामना करावा लागला होता. कामकाजी महिलांना मुलांपेक्षा स्वत:चे करिअर महत्त्वाचे वाटते. फक्त काही तास मुलीसोबत घालवून मला कामासाठी घराबाहेर जायचे नाहीये. जर असंच करायचे असते तर मला तिची गरजच काय  होती? मिशा काही कुत्र्याचे पिल्लू नाही. मला तिला मोठे होताना पाहायचे आहे, असे मीरा या मुलाखतीदरम्यान म्हणाली होती. तिच्या या वक्तव्यावरुन वादंग निर्माण झाले होते. कोणतीही आई आपल्या मुलाला आनंदाने घरी सोडून कामाला जात नाही, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर  उमटल्या होत्या. अनेकांनी या विधानावरून मीराला फैलावर घेतले होते.  मीरा जे काही बोलली त्यानंतर अनेक कामकाजी महिलांनी तिच्या नावे खुले पत्र लिहिले होते.