शाहीद व मीरा राजकुमारीला घेऊन अमृतसरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 18:11 IST
शाहीद कपूर व मीरा राजपूत हे आपल्या छोट्या राजकुमारीला घेऊन अमृतसरला गेले आहेत. ते यामध्ये आपल्या गुरुजीचा आशिर्वाद घेणार ...
शाहीद व मीरा राजकुमारीला घेऊन अमृतसरला
शाहीद कपूर व मीरा राजपूत हे आपल्या छोट्या राजकुमारीला घेऊन अमृतसरला गेले आहेत. ते यामध्ये आपल्या गुरुजीचा आशिर्वाद घेणार आहेत. त्यांनी आपल्या राजकुमारीचे नाव अजून सुद्धा ठेवले नाही. गुरुजीसोबत चर्चा केल्यानंतरच ते नाव ठेवणार आहेत. या जोडीसोबत पंकज कपूर सुद्धा असून, त्यांनीच त्या दोघांना गुरुजीकडे नेले आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुलीचे नाव जाहीर करण्यात येणार असून, गुरुजी त्यावर शिक्कामोर्तब करतील. मीराने २६ आॅगस्टला मुलीला जन्म दिला. शाहीद ‘उडता पंजाब’ नंतर मीराची देखभाल करण्यासाठी तिच्यासोबतच आहे. काही दिवसांपूर्वीच शाहीदने मीरासोबतचा सेल्फी शेअर केला होता. ही जोडी आपल्या राजकुमारीचे काय नाव ठेवतात याची उत्सकुता चाहत्यांना आहे.