‘फॅन’च्या अपयशामुळे रडला होता शाहरुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2016 10:53 IST
किंग खान अशी बिरुदावली मिरवणारा शाहरुख आजही त्याच्या प्रत्येक चित्रपटाबाबत नर्व्हस असतो. देशाविदेशात बॉक्स आॅफिसचे अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या ...
‘फॅन’च्या अपयशामुळे रडला होता शाहरुख
किंग खान अशी बिरुदावली मिरवणारा शाहरुख आजही त्याच्या प्रत्येक चित्रपटाबाबत नर्व्हस असतो. देशाविदेशात बॉक्स आॅफिसचे अनेक विक्रम प्रस्थापित केलेल्या शाहरुखला अपयशाची भीती वाटते.म्हणून तर या वर्षी प्रदर्शित झालेला ‘फॅन’ चित्रपट जेव्हा तिकीट खिडकीवर फारशी कमाल नाही दाखवू शकला तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले.नुकताच ५१ वा वाढदिवस साजरा केल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने स्टारडम, फेम, सक्सेस याविषयी दिलखुलास उत्तरे दिली. अपयशाबद्दल बोलतानाही त्याने कोणतीच आडकाठी ठेवली नाही. ‘फॅन’च्या अपयशाने तो कमालीचा नाराज झाला होता.तो सांगतो, ‘हा चित्रपट माझ्या हृदयाजवळचा होता. अशी भूमिका यापूर्वी कधीच केलेली नव्हती म्हणून स्वत: मी खूप एक्साइटेड होता. संपूर्ण टीमने यावर विशेष मेहनत घेतली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांचा आम्हाला अपेक्षित प्रतिसाद जेव्हा मिळाला नाही तेव्हा आम्ही सर्वच खूप निराश झालो होतो. अपयशाची कारणे शोधण्यासाठी खूप विचारमंथन आणि विश्लेषण केले. तो काळ भावनिकदृष्ट्या माझ्यासाठी खूप खडतर होता. मी तर अक्षरश: रडलो.’ फॅन का फॅन : शाहरुख खानदोन दशकांपासून बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या शाहरुखच्या तोंडून हे ऐकून त्याच्या चाहत्यांना तर धक्काच बसेल. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘कभी हां, कभी ना’ हा चित्रपट त्याचा सर्वात फेव्हरेट आहे. तोदेखील बॉक्स आॅफिसवर हीट ठरू शकला नव्हता. आजही तो या चित्रपटाविषयी फार जिव्हाळ्याने बोलतो. कदाचित जे आपल्या मनाच्या फार जवळचे असते, ते लोकांना आवडण्याची शक्यता कमीच असते.मग ‘फॅन’च्या अपयशामुळे तो असे हटके चित्रपट पुढे स्विकारणार का? या प्रश्नावर तो म्हणतो, ‘मी फार हट्टी माणूस आहे. तुम्ही मला जर ‘हे करू नको’ असे सांगितले तर मी आणखी त्वेषाने करणार. कदाचित मला अपयश येईल; पण मी करणार. जोखिम घेत घेतच मी आजवर इथपर्यंत पोहचलोय. आता तुम्ही मुळ स्वभाव तर नाही ना बदलू शकत.’वेल सेड एसआरके!