Join us  

शाहरूख खान - अनुष्का शर्मा क्लबमध्ये जावून म्हणणार ‘बीच बीच में...’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2017 9:35 AM

शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांनी आता मुंबईच्या क्लबमध्ये जाण्याची तयारी चालवली आहे. अर्थात ‘जब हॅरी मेट सेजल’च्या ...

शाहरूख खान व अनुष्का शर्मा या दोघांनी आता मुंबईच्या क्लबमध्ये जाण्याची तयारी चालवली आहे. अर्थात ‘जब हॅरी मेट सेजल’च्या शूटींगमुळे आलेला थकवा घालवण्यासाठी नाही तर प्रमोशनसाठी. होय,‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी शाहरुख व अनुष्काने एक नामी शक्कल लढवली आहे. ही शक्कल म्हणजे, शाहरूख व अनुष्का दोघेही आपल्या अख्ख्या टीमसह ३ जुलैला म्हणजे, उद्या मुंबईच्या अनेक क्लबमध्ये पोहोचणार आहेत. ‘जब हॅरी मेट सेजल’चे ‘बीच बीच में’ हे गाणे याठिकाणी दोघेही लॉन्च करणार आहेत. या गाण्यात शाहरूख व अनुष्का यांचा धम्माल डान्स आपल्याला बघायला मिळणार आहे.‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनसाठी वेगवेगळे अनोखे प्रयोग केले जात आहे. मग ते मिनी ट्रेलर लॉन्च करणे असो वा सेजल नाव असलेल्या मुलींना भेटणे असो. ‘जब हॅरी मेट सेजल’च्या प्रमोशनची तºहा इतरांपेक्षा एकदम हटके आहे. क्लबमध्ये जावून गाणे लॉन्च करणे, ही कल्पना त्यातल्या त्यात अफलातून अशीच आहे. यापूर्वी ‘जब हॅरी मेट सेजल’चे ‘राधा’ हे गाणेही अशाच अनोख्या पद्धतीने लॉन्च करण्यात आले होते. हे गाणे सध्या लोकांच्या ओठांवर आहे. येत्या आॅगस्टमध्ये शाहरूख व अनुष्काचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.या चित्रपटात शाहरूख खान एक पंजाबी गाईड बनलेला आहे. हरविंदर सिंह नेहरा नावाचे पात्र त्याने रंगवले आहे. अर्थात सगळेच त्याला हॅरी म्हणूनच ओळतात. अनुष्काने यात एका बबली गुजराती मुलीची भूमिका साकारली आहे. सेजल युरोप ट्रिप जाते आणि तिला हॅरी भेटतो. मग दोघेही प्रेमात पडतात, अशी याची कथा आहे. यापूर्वी शाहरूख व अनुष्का हे दोघे ह्यरब ने बना दी जोडी  व जब तक है जान या चित्रपटात एकत्र दिसले होते.